बारामतीत गरोदर मातांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:47+5:302021-04-18T04:10:47+5:30
बारामती : बारामतीत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत गरोदर व सत्नदा मातांना आहार किट, बाळांत तसेच ...
बारामती : बारामतीत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत गरोदर व सत्नदा मातांना आहार किट, बाळांत तसेच माता व बालकांना गुळ शेंगदाणा पोषक वडी, तसेच गरोदर मातांना बेबी केअर किट वाटप, अंगणवाडी केंद्रास शालेय शिक्षण संचाचे वाटप करण्यात आले.
सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांच्या हस्ते हे वाटप झाले. कुपोषणाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून गरोदर व स्तनदा मातांसाठी व मुलामुलींसाठी बाळंतविडा साहित्य दिले जाते. त्यात खारीक, खोबरे, डिंक, गूळ, काजू, आळीव, जवस, तूप, शेंगदाणे, फुटाणे यांचा समावेश असतो. यामुळे कुपोषण कमी होऊन बालक सुदृढ व सशक्त होण्यास उपयोग होतो.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून प्रकल्पातील कार्यरत १६४ अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण संच खेळणी साहित्य यांचा पुरवठा करण्यात आला. मुलांचा शारिरीक, बौध्दिक व मानसिक विकास व्हावा असा या मागचा उद्देश आहे.
—————————————————