भुईकोट किल्ल्याच्या आवारात जगातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:10+5:302021-08-19T04:14:10+5:30
—आमदार रोहित पवार यांची घोषणा आमदार रोहित पवार यांची घोषणा बारामती:महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट ...
—आमदार रोहित पवार यांची घोषणा
आमदार रोहित पवार यांची घोषणा
बारामती:महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या आवारात ७४ मीटरचा जगातील सर्वांत मोठा भगवास्वराज्य ध्वज लावला जाणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली.
आमदार पवार यांच्या बारामतीत राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पार पडला. या वेळी आमदार पवार यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किंवा शिवपट्टन किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. किल्ल्याच्या कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून ध्वज लावला जाणार आहे. भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. शेवटी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाणार असल्याचे पवार म्हणाले.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यस्तरीय सृजन भजनस्पर्धेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. यंदा त्याचं तिसरं पर्व देखील तेवढ्याच जल्लोषात रंगलं. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांतून, १९७ तालुक्यांतून १२२० संघ तसेच १४५१२ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. १५ ऑगस्ट २०२१ रोजी या स्पर्धेची बारामती येथे सांगता झाली. आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पाडला गेला. दर वर्षीप्रमाणे यंदा ही कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून ऑनलाईन प्रतिसाद मिळाला. तसेच माऊली सावंत, श्रीधर भोसले आणि रामेश्वर डांगे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
कर्जत-जामखेड विभागीय आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय अशा दोन वेगवेगळ्या गटांत जिंकलेले स्पर्धक:
सृजन भजन स्पर्धा- कर्जत-जामखेड विभाग
प्रथम क्रमांक- हरिभाऊ काळे
द्वितीय क्रमांक- पांडुरंग डाडर
तृतीय क्रमांक- शिवाजी पांढरे
———————————————
सृजन भजन स्पर्धा- महाराष्ट्र राज्यस्तरीय
प्रथम क्रमांक- गोपाळ सालोडकर, अमरावती
द्वितीय क्रमांक- विद्याधर तांबे, मुंबई
तृतीय क्रमांक- रुपेश देशमुख, कोकण
—————————————————
स्पर्धकांना आमदार पवार व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वारकरी संप्रदायमधील मान्यवरांचा देखील राजेंद्र पवार, सुनंदा पवार, रोहित पवार व कुंती पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सृजन भजन स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील ३१ संघ सहभागी झाले होते. यामध्ये तमिळनाडूतील २६ संघ, कर्नाटकातील ३ संघ, गुजरात आणि मध्य प्रदेश येथील प्रत्येकी १ संघाने सहभाग घेऊन आपल्या भजन संगीततून संत परंपरेतील भक्तीची अनुभूती दिली.
फोटोओळी— राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेतील विजेत्यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
१८०८२०२१ बारामती—१०
——————————————