विद्यापीठाकडून ऑनलाईन प्रॅक्टिकलची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:16+5:302021-05-09T04:11:16+5:30

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रॅक्टिकल ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत आवश्यक ...

Preparation of online practicals from the university | विद्यापीठाकडून ऑनलाईन प्रॅक्टिकलची तयारी

विद्यापीठाकडून ऑनलाईन प्रॅक्टिकलची तयारी

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रॅक्टिकल ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत आवश्यक तयारी केली आहे. त्यासाठी संबंधित प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने प्रॅक्टिकल परीक्षा घेणे आता शक्‍य होणार आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील विज्ञान, अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कोरोनामुळे रखडल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन प्रात्यक्षिक करणे शक्य होत नाही. तसेच, आणखी किती दिवसांनी कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होणार हे सांगता येत नाही. दोन्ही सत्रांच्या प्रॅक्टिकल परीक्षा वर्षाच्या शेवटी घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, वर्षभर हीच परिस्थिती कायम राहिली तर विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येऊ शकणार नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी गुणवत्तापूर्ण व्हिडिओ तयार केले आहेत.

विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत काही विषयांच्या शिक्षकांची कार्यशाळा घेऊन त्यांना ऑनलाइन प्रॅक्टिकलबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व प्राध्यापकांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रॅक्टिकल परीक्षा घेणे शक्य होणार आहे, असे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. चासकर यांनी सांगितले.

-----------------

विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. प्रॅक्टिकलचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात विज्ञान शाखेच्या काही विषयांचा समावेश डिस्टन्स एज्युकेशनमध्ये करणे सुद्धा शक्य होईल.

- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Preparation of online practicals from the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.