रस्ते दत्तक योजनेचा अंतिम आराखडा तयार

By Admin | Published: December 10, 2014 12:07 AM2014-12-10T00:07:38+5:302014-12-10T00:07:38+5:30

शहरातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अधिका:यांवर सोपविण्यासाठी महापालिकेकडून रस्ते दत्तक योजना राबविण्यात येणार आहे.

Prepare the final plan of road adoption plan | रस्ते दत्तक योजनेचा अंतिम आराखडा तयार

रस्ते दत्तक योजनेचा अंतिम आराखडा तयार

googlenewsNext
पुणो : शहरातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अधिका:यांवर सोपविण्यासाठी महापालिकेकडून रस्ते दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत अधिका:यांना देण्यात येणा:या रस्त्यांचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार येत्या 15 डिसेंबरपासून ही योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 
संबंधित अधिका:याने रस्ता दत्तक घेतल्यानंतर या रस्त्याची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी अधिका:यावर राहील. तसेच, या रस्त्यावरील पावसाळी गटारे, राडारोडा, वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत खांब, बेकायदा होर्डिग, फ्लेक्स, बॅनर; तसेच साईड मार्जिनमध्ये होणारी बेकायदा बांधकामे यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिका:याची असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 
क्षेत्रीय कार्यालयात काम करणा:या अधिक:यांना प्रत्येकी एक रस्ता दत्तक देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. रस्त्यावरील स्वच्छतेबरोबरच बेकायदा होर्डिग, जाहिरात फलक, रस्त्यावरील खड्डे, पार्किग यावर संबंधित अधिका:याचे विशेष लक्ष राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा घेऊन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी रस्ते दत्तक योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये असून, त्यामध्ये उपअभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आकाशचिन्ह परवाना अधिकारी यांनी किमान एक रस्ता दत्तक घ्यावा, असे आदेश आयुक्त कुमार यांनी दिले आहेत.  (प्रतिनिधी)
 
माहिती पालिकेच्या वेबसाईटवर 
दरम्यान, ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील कोणता रस्ता कोणत्या अधिका:याकडे आहे, त्यांच्या नावांची यादी आणि संबंधित अधिका:याचा मोबाईल क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे संबधित रस्त्याबाबत काही तक्रारी असल्यास अथवा काही माहिती द्यायची असल्यास नागरिकांना या अधिका:यांशी संपर्क साधून माहिती देणोही शक्य होणार आहे.  शहरात सर्वसाधारण 18क्क् किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यांपैकी 15क् किलोमीटर रस्त्यावरून वाहतूक होत असल्याची माहिती पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे. महापालिकेच्या 2क्क् अधिका:यांकडे हे रस्ते विभागून देण्यात येणार आहेत.

 

Web Title: Prepare the final plan of road adoption plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.