गणेश विसर्जनासाठी सज्जता
By admin | Published: September 13, 2016 01:42 AM2016-09-13T01:42:35+5:302016-09-13T01:42:35+5:30
गणेश विसर्जनासाठीची सर्व तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे. शहरातील सर्व म्हणजे १७ घाटांवर १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली
पुणे : गणेश विसर्जनासाठीची सर्व तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे. शहरातील सर्व म्हणजे १७ घाटांवर १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, संभाजी पुलाखालील मुख्य घाटावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
अलका चित्रपटगृह चौकात महापालिकेच्या वतीने महापौर प्रशांत जगताप विसर्जन मिरवणुकीतील मंडळांचे स्वागत करतील. त्यासाठी स्वागत मंडप उभारण्यात येत आहे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर ते थेट दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत विविध अधिकाऱ्यांना या मंडपात थांबण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या क्षेत्रातील घाटांवर विसर्जनासाठीचे व निर्माल्यासाठीचे हौद, जीवरक्षकांची नियुक्ती, विद्युत विभागाचे कर्मचारी, घाटांवर धोक्याच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्सची व्यवस्था केली आहे.
पालिका आरोग्य विभागाने डेक्कन जिमखाना, नूतन मराठी विद्यालय अशा दोन ठिकाणी वैद्यकीय पथकांची व्यवस्था केली आहे. तीन शिफ्टमध्ये ही पथके मिरवणूक संपेपर्यंत कार्यरत राहतील. स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, दोन नर्स, तसेच शिपाई, वाहनचालक यांचा या पथकात समावेश आहे. तातडीची आरोग्य सुविधा ते देऊ शकतील. मिरवणुकीत गुलालाचा वापर करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात विसर्जनासाठी केलेली व्यवस्था याप्रमाणे आहे. घाट नसेल त्याठिकाणी विसर्जनासाठी पाण्याचे मोठे लोखंडी हौद उपलब्ध आहेत़
टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय : दत्तवाडी, एस. एम. जोशी पथ, लकडी पूल, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील रस्ता, विठ्ठलवाडी नदीपात्र, वडगाव कॅनॉल, धायरी फाटा कॅनॉल, नांदेड फाटा कॅनॉल, पर्वती पायथा कॅनॉल, सनसिटी नदीपात्र, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय-राजाराम पूल, सूर्यनंदा लॉन, सिद्धेश्वर घाट, हॅपी कॉलनी, तेजनगर, कोथरूड, वारजे पुलाखालील उद्यान, गांधीभवन, कर्वेनगर,
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : गंगूबाई भिमाले उद्यान, वृदांवन सोसायटी, यशवंतराव चव्हाण शाळा, गंगाधाम चौक. कोंढवा वानवडी क्षेत्रीय कार्यालय- शिंदे छत्री, शरद पवार उद्यान, कोंढवा बुद्रुक, काकडेनगर, जांभूळकर मळा, सोपान बाग, संत गाडगेमहाराज शाळा मैदान. धनकवडी क्षेत्रीय कार्यालय- मनपा शाळा क्रमांक ९१, गुलाबनगर, कात्रज रॅम्प, उत्कर्षनगर, कात्रज गावठाण, राजस सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल उर्दू शाळा, चिंतामणी देशमुख शाळा.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालय : मुळा रोड घाट, संगमवाडी घाट, स्फूर्ती सोसायटी घाट, वृद्धेश्वर घाट, पांचाळेश्वर घाट. हडपसर क्षेत्रीय कार्यालय- हिंगणे मळा, लक्ष्मी कॉलनी, गोंधळेनगर नावरे बिल्ंिडग, उन्नतीनगर. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय- क्वालिटी बेकरी कॅनॉल, मुंढवागाव गायकवाड आळी नदीपात्र, बहिरोबा पंपिंग स्टेशन, बंडगार्डन हौद, संगम घाट, शाहू तलाव हौद. नगर रोड क्षेत्रीय कार्यालय- खराडी गाव घाट, मुंढवा पूल घाट, वडगाव शेरी घाट, खुळेवाडी विहीर, दर्गा विहीर, शहाची विहीर, वडगाव शेरी नवीन घाट.
येरवडा क्षेत्रीय कार्यालय : संत माळीमहाराज शाळा, चव्हाण चाळ, कळसगाव घाट, भारतनगर, शांतीनगर, धानोरी विहीर, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय- अमृतेश्वर मंदिर, नेने घाट, भिडे पुलाशेजारी, अष्टभुजा देवी मंदिराजवळ, ओंकारेश्वर मंदिराजवळ, आनंदीबाई कर्वे शाळा, गौरी आळी, मनपा शाळा क्रमांक ८५, पटवर्धन समाधीजवळ.