आता तयारी मतदानाची.!

By admin | Published: October 13, 2014 11:31 PM2014-10-13T23:31:20+5:302014-10-13T23:31:20+5:30

पदयात्र, शेकडो कार्यकत्र्यासह काढलेल्या दुचाकी रॅली, घोषणा आणि रिक्षातून दिवसभर सुरु असलेला प्रचार यामुळे आज दिवसभर शहर दुमदुमून गेले होत़े

Prepare now for the election! | आता तयारी मतदानाची.!

आता तयारी मतदानाची.!

Next
पुणो :  पदयात्र, शेकडो कार्यकत्र्यासह काढलेल्या दुचाकी रॅली, घोषणा आणि रिक्षातून दिवसभर सुरु असलेला प्रचार यामुळे आज दिवसभर शहर दुमदुमून गेले होत़े सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपल्यावर आता उमेदवारांनी बुधवारी होणा:या मतदानासाठीच्या तयारीला सुरुवात केली आह़े उमेदवारांच्या या शक्तिप्रदर्शनाने शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती़ 
विधानसभेच्या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ख:या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली़ युती आणि आघाडी तुटल्याने यंदा प्रमुख पाच पक्षांचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात रिंगणात उतरल्याने उमेदवारांची संख्या वाढली होती़ त्यात दिवस कमी मिळाल्याने उमेदवारांनी पदयात्र, कोपरासभेद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला 
होता़ सकाळी आणि सायंकाळी पदयात्रेद्वारे संपर्क, दुपारी छोटे-मोठे मेळावे, बैठका, त्यानंतर रात्री पुन्हा मतदारसंघातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीगाठी यावर जवळपास सर्व प्रमुख उमेदवारांनी भर दिला होता़ अनेकांनी संपूर्ण मतदारसंघाच्या प्रचाराच्या दोन फे:या पूर्ण केल्या़ 
प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी एकाच दिवसात मतदारसंघातील जास्तीत भागामध्ये पोहोचण्यासाठी दुचाकी रॅली काढल्या़ जवळपास प्रत्येक उमेदवारांच्या रॅलीमध्ये शेकडोने कार्यकर्ते सहभागी झाले होत़े या रॅली एकामागोमाग येत असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी अनुभवण्यास येत होती़ याबरोबरच रिक्षातून प्रचार केला 
जात होता़ (प्रतिनिधी)
 
च्प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी प्रमुख कार्यकत्र्याच्या बैठका घेऊन बुधवारी होणा:या मतदानासाठीचे नियोजनावर भर देण्यास सुरुवात केली़ मतदान केंद्रांवर नेमलेल्या प्रतिनिधींचे पासेस त्यांच्यार्पयत पोहचविण्यास सुरुवात केली़ बुथप्रमुखांवर सोपविण्यात आलेली कामे पूर्ण झाली की नाही, याचा आढावा रात्री घेतला जात होता़ 

 

Web Title: Prepare now for the election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.