स्पर्धा परीक्षा अाहे मनाेहर तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 09:04 PM2018-04-28T21:04:26+5:302018-04-28T21:04:26+5:30

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक प्रयत्नानंतरही काहींना अपयशाचा सामाना करावा लागताे. अशावेळी उमेदीची वर्ष या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गेल्याने अनेकांना नैराश्य येते. त्यामुळे या क्षेत्रात येण्याअाधी तुमचा प्लॅन बी तयार ठेवा असा संदेश या क्षेत्रात येणाऱ्यांना या परीक्षांची तयारी करणारे देत अाहेत.

prepare for plan b before doing study of competitive exams | स्पर्धा परीक्षा अाहे मनाेहर तरी...

स्पर्धा परीक्षा अाहे मनाेहर तरी...

Next

पुणे : नुकताच युपीएससी परीक्षेचा निकाल लागला. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. दुसरीकडे ज्यांना यश मिळवता नाही अाले त्यांची परंतु निराशा झाली. अनेक वर्ष प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने काहींना नैराश्याने ग्रासलं तर काहींना हा मार्गच साेडला. अशीच परिस्थिती एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांची. अायुष्यातील उमेदीची वर्ष स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गेल्याने पुढे अाता करायचे काय, असा प्रश्न अनेकांना पडताे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करा, मात्र प्लॅन बी तयार ठेवा असा संदेश या क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्यांना या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी देत अाहेत. 
    सध्या पुण्यात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखांपेक्षा अधिक अाहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील अाहेत. त्यातही अधिक विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील अाहेत. अापला मुलगा तहसीलदार, कलेक्टर, अायपीएस हाेईल अाणि अापले सर्व दैन्य दूर करेल या भावेनेने ग्रामीण भागातले पालक पदरमाेड करुन अापल्या मुला-मुलीला पुण्यात या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पाठवतात. ग्रामीण भागात बीए, बीकाॅम, बीएसस्सी या पारंपारिक काेर्सेस पलिकडे इतर व्यवसायिक काेर्सेसची संख्या कमी असते. साहजिकच तरुण बीए, बीकाॅम करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतात. परंतु तीन-चार प्रयत्नानंतरही यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना नैराश्य येत अाहे. त्यातही उमेदीची अनेक वर्ष ही तयारी मध्येच गेल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्या समाेर उभा राहत अाहे. अनेकांचा प्लॅन बी नसताे. त्यामुळे त्यांना पुन्हा अापल्या गावाकडे परतून छाेटी माेठी कामे करावी लागत अाहेत. 
    ग्रामीण भागात या परीक्षांमध्ये येणाऱ्या अपयशाकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. दाेन-तीनदा प्रयत्न करुनही पास न झाल्यास मुलाने पुण्याला जाऊन मजा केली, हुल्लड बाजी केली असे समजले जाते. पालकांना मुलांना पुण्यात राहण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याने कुटुंबाची अार्थिक उन्नती खुंटत अाहे. दर महा सात ते अाठ हजार रुपये अापल्या पाल्याला त्यांना द्यावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा हे अाता चक्रव्यूह वाटू लागले अाहे. एकदा यात अडकलाे की मागे फिरणे अवघड जाते. वयाच्या 28-32 वयापर्यंत अनेकांना यश मिळत नाही. परंतु ते प्रयत्न करायचे साेडत नाहीत. सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे त्यांचे लग्नाचे वयही अनेकदा निघून जाते. खासकरुन मुलींना जर दाेन-तीन प्रयत्नात यश मिळाले नाही तर पुन्हा त्या घर अाणि मूल यात अडकून जात अाहेत. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल टाकण्याअाधी अापला प्लॅन बी हा पक्का करा असचा सल्ला अाता हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देत अाहेत. 
    याबाबत बाेलताना निलेश निंबाळकर म्हणाला, मी गेली अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करताेय. 12 वी नंतर गावातील अनेकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला दिला म्हणून अार्टस ला अॅडमिशन घेतले. अाणि ग्रॅज्युएेशन नंतर तयारी करण्यासाठी पुण्यात अालाे. माझ्यासारखी अनेक मुले अशी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. परंतु यश न मिळाल्यास त्यांना निराश हाेऊन परतावे लागते. बहुतांश मुलांचा प्लॅन बी तयार नसल्याने अपयशामुळे त्यांना नैराश्य येते. त्याने ते खचून जातात. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे त्यांना शेती असल्यास शेती किंवा मग गावी छाेटीमाेठी कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील काहीजण ही परीक्षा देऊन माेठ्या पदांवर गेले अाहेत. त्यांची भाषणे, सेमिनारही ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये हाेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांचे अाकर्षण निर्माण हाेते. मला वाटतं या स्पर्धा परीक्षा म्हणजे एक भयानक चक्रव्यूह असून त्यातून बाहेर पडणे कठीण असते. त्यामुळे या क्षेत्रात येण्याअाधी प्रत्येकाने प्लॅन बी हा तयार ठेवायला हवा. 
    अमित मिलख याचे ही सारखेच म्हणणे अाहे. अमित हा 2013 पासून एसपीएससीची तयारी करताेय. यंदा ताे यशस्वी हाेईल अशी त्याला अाशा अाहे. परंतु अाधिच्या अनेक प्रयत्नात अपयश अाल्याने अनेकदा नैराश्य अाल्याचे ताे म्हणताे. सातत्याने अपयश अाल्यास घरच्यांचा तसेच गावाकडील लाेकांचा अापल्याकडे पाहण्याचा दृष्टीकाेन बदलताे. ही भावना खूप भायनक असते. त्यामुळे अापल्याला एकदा-दाेनदा अपयश अाल्यास अापली क्षमता लक्षात घेत वेगळा मार्ग निवडणे अावश्यक अाहे. असे त्याला वाटते. 

Web Title: prepare for plan b before doing study of competitive exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.