प्रदूषण रोखण्याचा ‘आराखडा’ तयार!, रासायनिक सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करून वनविभागाला देण्याची तयारी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:09 AM2017-11-20T00:09:19+5:302017-11-20T00:10:10+5:30

कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Prepare 'Plan' to Prevent Pollution! Prepares to Complete Forestry by Completing Chemical wastewater | प्रदूषण रोखण्याचा ‘आराखडा’ तयार!, रासायनिक सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करून वनविभागाला देण्याची तयारी पूर्णत्वाकडे

प्रदूषण रोखण्याचा ‘आराखडा’ तयार!, रासायनिक सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करून वनविभागाला देण्याची तयारी पूर्णत्वाकडे

Next

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रदूषणाच्याबाबतीत जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कुरकुंभ येथील पाण्याच्यासंदर्भात घेण्यात आलेला अ‍ॅक्शन प्लॅन जवळपास तयार झाला असून यावर युद्धपातळीवर काम करण्यात येत असल्याची माहिती या संबंधित अधिकाºयांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कुरकुंभ येथील रासायनिक प्रदूषणाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याची सांगत सांडपाण्याला पूर्ण प्रक्रिया न करता उघड्यावर सोडणाºया कंपन्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी अगदी अल्पावधीत या सर्व प्रकारांवर निर्णय देऊन कित्येक वर्षांपासून जाणूनबुजून खितपत पडलेल्या विषयाला निकाली काढल्याने कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी राव यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून या सर्व घटनेचा लेखाजोखा मागितला आहे.
याबाबत लवकर उपाययोजना करून माहिती मागितली आहे. त्यानुसार कुरकुंभ येथे जोमात काम सुरू असून येणाºया अगदी दोन दिवसांत या प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाऊन प्रक्रिया केलेले सांडपाणी वनविभागाला सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेली दहा वर्षांत वनविभागाच्या जागेत पाणी सोडण्याची यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे या आदेशानुसार यावर तत्काळ काम सुरू करण्यात आले असून याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे येणाºया काही दिवसांतच याचे काम पूर्ण करून पाण्याची विल्हेवाट लागणार आहे. महाराष्ट्र विकास मंडळाच्या अधिकाºयांनीदेखील याबाबत दुजोरा दिला असल्याने आता लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होताना दिसणार असल्याची चिन्हे आहेत.
>कुरकुंभ येथील जनतेने प्रथमच जनआक्रोश आंदोलन करीत या सर्व जबाबदार प्रशासनाला जाब विचारला होता. ग्रामस्थांच्या या लढ्याचे प्रथमच पडसाद उमटून सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.याचाच परिणाम म्हणूनच या लढ्याला यश प्राप्त झाले व शासनदरबारी याची योग्य दखल घेतली गेली. परिणामी मोठ्या स्वरूपात कुरकुंभ येथील रासायनिक पाण्याचे प्रदूषण थांबले आहे.
>उग्र वासातून मुक्ती
कुरकुंभ येथील ओढ्यातून मोठ्या स्वरुपात वाहत येणारे रासायनिक सांडपाणी अगदी कुरकुंभच्या मुख्य चौकात बारामतीकडे जाणाºया मार्गावरील पुलाखाली जमा होत होते. परिणामी या सर्व ठिकाणी उग्र वास व दुर्गंधी पसरली होती. या ओढ्याच्या कडेलाच दर गुरुवारी आठवडेबाजार भरत असल्याने हजारो नागरिक या दुर्गंधीने त्रस्त होते. तसेच यालाच लागून प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने त्यालादेखील याचा दुष्परिणाम भोगावा लागत होता. मात्र सामूहिक सांडपाणी प्रक्रिया बंद असल्याने तो उग्र वास जवळपास बंद झाला असून नागरिकांनी व या ओढ्याने दोन दशकातून पहिल्यांदा या प्रदूषणातून मुक्ती मिळवली असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
>कंपन्यांची झाडाझडती
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रथमच मोठ्या स्वरुपात याची गंभीर दखल घेऊन सर्व कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. विविध अधिकारी या ठिकाणी येऊन कंपन्यांची पाण्याबाबत माहिती गोळा करीत आहेत.
अशा प्रकारची मोठी कारवाई प्रथमच या ठिकाणी होत असल्याचे काही कंपन्यांच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. त्यामुळे अगदी थोड्या काळातच सदोष कंपन्या समोर येणार असून या सर्वांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Prepare 'Plan' to Prevent Pollution! Prepares to Complete Forestry by Completing Chemical wastewater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे