ज्वेलर्स दुकानावर दरोडे टाकण्याच्या तयारी; पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक

By रोशन मोरे | Published: July 7, 2023 03:53 PM2023-07-07T15:53:26+5:302023-07-07T15:58:55+5:30

आरोपींनी दरोडा टाकण्यासाठी बाळगलेले मिरची पूड, दोरी, घातक शस्त्र जप्त

Preparing to rob a jeweler's shop; Big police action, three arrested | ज्वेलर्स दुकानावर दरोडे टाकण्याच्या तयारी; पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक

ज्वेलर्स दुकानावर दरोडे टाकण्याच्या तयारी; पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक

googlenewsNext

पुणे: ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकून लुटण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनीअटक केली आहे. तसेच आणखी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.५) मावळवाडी रोड, हडपसर येथे करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलिस नाईक विनोद बाळासाहेब शिवले (वय ३६) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव गणेश बबन लोंढे (वय २३, रा. तरवडे वस्ती, महमंदवाडी, पुणे), निरंजन दीपक ननवरे (वय १९, रा. सोलापूर) माऊल बंडू लोंढे (वय २१, हडपसर) यांना अटक केली असून हे आरोपी रेकॉर्डवरील आहेत. तसेच सोहेल जावेद शेख (व रा.हडपसर) , बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड, संंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (रा. रामटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील गणेश ज्वेलर्स हे दुकान बंद होण्याच्या आधी त्यात घुसून सोन्या चांदीचे दागिने लुटण्याची तयारी आरोपींनी केली होती. त्या करिता आरोपी मिरची पूड, दोरी, घातक शस्त्र जवळ बाळगली होती. आरोपी एकत्रित दरोड टाकण्याच्या तयारी असताना पोलिसांनी त्यांना अटक केले. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी १० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Preparing to rob a jeweler's shop; Big police action, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.