कलाकारांच्या उपस्थितीत ‘लकी’चे शीर्षक गीत प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 04:00 AM2019-02-01T04:00:24+5:302019-02-01T04:00:39+5:30

‘लोकमत’च्या सहयोगाने उपक्रम; पुणेकरांची भरभरून दाद

In the presence of artists, Lucky's title song is published | कलाकारांच्या उपस्थितीत ‘लकी’चे शीर्षक गीत प्रकाशित

कलाकारांच्या उपस्थितीत ‘लकी’चे शीर्षक गीत प्रकाशित

Next

पुणे : लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. ‘लोकमत’च्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अभय महाजन-दीप्ती सती या लकी कपलसोबतच सिनेमाचे निर्माते सूरज सिंग, दीपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिद्धार्थ जाधव या वेळी उपस्थित होते. पुण्यात झालेल्या या सोहळ्याला पुणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती. या वेळी कलाकारांनी उपस्थितांशी संवाद साधत सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरला.

‘लकी’ सिनेमा सुरू होण्याच्या अगोदरच मी एका व्हिडीओतून म्हणालो होतो, की मी ‘लकी’ असणार आहे. मी खरंच स्वत:ला लकी समजतो की, संजयदादासोबत मला पुन्ह:पुन्हा काम करायला मिळालं. सई, सिद्धू, तेजस्विनी आणि माझ्यावर चित्रित झालेलं हे गाणे नक्कीच तुम्हाला आवडेल. - उमेश कामत, अभिनेता

दादांच्या सिनेमाचा हिस्सा होणे, मला नेहमीच आवडते. ‘येरे येरे पैसा’नंतर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत यांच्यासोबत पुन्हा एकदा या गाण्यानिमित्ताने काम करता आलंय. आमच्यासाठी हे जणू एक वर्षानंतरचे ‘रियुनियन’ असल्यासारखे आहे.
- सिद्धार्थ जाधव , अभिनेता

मी खूप लकी आहे, की संजयदादाच्या बऱ्याच सिनेमांचा मी हिस्सा होऊ शकले. लकी सिनेमाचा मी हिस्सा आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
- सई ताम्हणकर, अभिनेत्री

Web Title: In the presence of artists, Lucky's title song is published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.