शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:13 AM2021-03-23T04:13:22+5:302021-03-23T04:13:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वरूणराजाने सलग दुसऱ्या दिवशी शहरात हजेरी लावली असून, पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा दिला. पुणे शहराच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वरूणराजाने सलग दुसऱ्या दिवशी शहरात हजेरी लावली असून, पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा दिला. पुणे शहराच्या पश्चिम भागात रविवारी जोरदार सरी कोसळल्या होत्या. सोमवारी पुण्यातील विश्रांतवाडी, कर्वेनगर, वारजे माळवाडी, वडगाव शेरी, बिबवेवाडी, शिवाजीनगर भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत ५ मिमी पावसाची नोंद झाली होती.
आज सकाळपासून आकाश निरभ्र होते. सकाळपासून उकाडाही जाणवत होता. दुपारनंतर आकाश ढग जमू लागले आणि दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या.
पुणे शहरात २३ ते २५ मार्च दरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे.