कान्हूरमेसाई परिसरात पावसाची हजेरी : खोळंबलेल्या पेरणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:10+5:302021-07-11T04:10:10+5:30
शिरूर तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती काही भागात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या झाल्या ...
शिरूर तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती काही भागात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या झाल्या तर काही भागात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने अद्यापही पेरण्या झाल्या नव्हत्या पेरण्या झालेल्या शिवारातील पिके सध्या कोळपणी इस आली आहेत तर ज्या भागात पाऊस नाही या भागातील शेत अद्यापही काळेभोर दिसत आहे सर्वत्र सारखा पाऊस न झाल्याने काही भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. सहा जुलै रोजी या परिसरात पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांनाही जीवदान मिळाले आहे एकूणच तालुक्यात सर्व समावेशक पाऊस नसल्याने काही भागात पिके हिरवीगार दिसत आहेत तर काही भागातील शेत काळीभोर दिसताहेत. तालुक्यातील चिंचोली मोराची, कान्हूर मेसाई, शास्ता बाद, खैरेवाडी, मिडगुलवाडी, खैरेनगर शिवारातील काही भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरात १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली या पावसामुळे सुकून चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
--
चौकट
उगवलेले पिकांना जिवदान
कान्हुर मेसाई परिसरात जूनच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला होता. या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसावर पिके चांगली उगवून आली शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिली. पाण्याअभावी पिके सुकून चालली होती ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. त्यांनी तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू केले होते तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांची पिके सुकून चालली होती..सोमवारी या परिसरात पाऊस झाला या पावसामुळे सुकून चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले यामुळे बळीराजा सुखावला असून मशागतीच्या कामांना वेग आला आहे..
--
फोटो क्रमांक : १० कान्हूरमेसाई पेरणी सुरवात
फोटो ओळी : कान्हुर मेसाई परिसरात ज्या भागातील सुरुवातीस पाऊस झाला त्या भागातील पिके अशी भरली आहे..
फोटो क्रमांक : १० कान्हूरमेसाई पेरणी सुरवात २
फोटो ओळी : खोळंबलेल्या पेरणीला वेग आल्याचे दिसत असल्याचे चित्र दिसत आहे