पुणेकरांवर करवाढीचा बोजा टाकणारे आयुक्तांचे अंदाजपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 12:30 PM2019-01-17T12:30:45+5:302019-01-17T15:13:34+5:30

पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले.

Presenting the budget of 6 thousand 85 crores from Pune Municipal Commissioner | पुणेकरांवर करवाढीचा बोजा टाकणारे आयुक्तांचे अंदाजपत्रक

पुणेकरांवर करवाढीचा बोजा टाकणारे आयुक्तांचे अंदाजपत्रक

Next

पुणेपुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा या अंदाजपत्रकामध्ये तब्बल ६८८ कोटींची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. महापालिका आयुक्तानी अंदाजपत्रक सादर करताना उत्पन्न वाढीवर भर दिला आहे . त्यामुळे  यंदाच्या चालू आर्थिक वर्षी तब्बल ६ हजार ८२  कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.                      -
 
   अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे :                                     
 - संकल्प ते सिध्दी” चळवळीसाठी विशिष्ट योजनांवर लक्ष केंद्रीत

 - १० लाख पेक्षा सर्व कामाचा सामाजिक परिणाम काय होणार तपासणार.          

 -  उत्पन्न वाढीनंतर भर देणार  

 - २४ बाय ७ समान पाणी पुरवठा येजनेला गती देणार.

 - भामा आसखेड योजना आॅक्टोबर २०१९ अखेर पर्यंत पूर्ण करणार.पुनर्वसनासाठी अंदाजपत्रकात तरतुद    

 - कात्रज तलावांचे प्रदुषण रोखणार  

 - घनकचरा व्यवस्थापनसाठी ५४६ कोटींची तरतुदी.

 - जानेवारी २०२० नंतर शंभर टक्के कच-यावर प्रक्रिया करणार

 - अंदाजपत्रकात प्रथमच आयुक्ताकडून नगरसेवकांच्या वर्गीकरणाला चाप लावला 

 - प्रशासनाच्या मंजुरीशिवाय परस्पर ठरावाद्वारे वर्गीकरण करू असे केले स्पष्ट

 - शिवणे - खराडी रस्त्यासाठी ३१.६० कोटींची तरतुद

 - आयुक्काकडून पुणेकरांवर करवाढीचा बोजा - मिळकतकरामध्ये १२ टक्के , तर पाणीपट्टीत १५ टक्के कर वाढ
 

Web Title: Presenting the budget of 6 thousand 85 crores from Pune Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.