पुणे मनपा स्थायी समितीचे 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक सादर

By admin | Published: May 11, 2017 01:39 PM2017-05-11T13:39:37+5:302017-05-11T13:39:37+5:30

पुणे मनपाचे वर्ष 2017-18 या आर्थिक वर्षाचे स्थायी समितीचे 5 हजार 912 कोटी रूपयांचे अंदाजपञक सादर करण्यात आले आहे.

Presenting the budget of Pune Municipal Standing Committee of Rs. 5,912 crore | पुणे मनपा स्थायी समितीचे 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक सादर

पुणे मनपा स्थायी समितीचे 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक सादर

Next
>ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 11 - प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांना पाच लाखांचे अपघात विमा संरक्षण, वैद्यकीय व नर्सिंग कॉलेज सुरू करणे, सर्व शाळा ई-लर्निग करणे, शहरामध्ये विविधी ठिकाणी योग्य केंद्र उभारणे, समुद्री जैव विविधता केंद्र उभारणे, 13 बस डेपो सुरू करणे, अशा विविध योजना असलेल्या पुणे महानगरपालिकेचे वर्ष 2017-18 या आर्थिक वर्षाचे स्थायी समितीचे 5 हजार 912 कोटी रूपयांचे अंदाजपञक स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहोळ यांनी गुरूवारी  ( दि.11) रोजी सादर केले.  
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्राशासनाच्या वतीने 5 हजार 600 कोटीचा अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केला होता. त्यामध्ये नव्या योजनाचा समावेश करत स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहळ यांनी 312 कोटीनी वाढ करत 5 हजार 912 कोटीचे अंदाजपत्रक सर्व साधारण सभेपुढे सादर केले.
 
या अंदाजपत्रकातील काही महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्प पुढील प्रमाणे :                                  
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना कवच योजना यासाठी 10 कोटीची विशेषटकांत तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने हा अपघात विमा पाच लाख रुपयांचा असणार असून त्यामध्ये प्रामणिक पणे कर भरणाया होणार आहे. 
यामधून महापालिकेचे उत्पन्न देखील वाढेल आणि नागरिक विमा ही मिळणार आहे.                    
 
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय यासाठी 15 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. हे महाविद्यालय डॉ नायडू रुग्णालयात हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. त्यातून शहरातील रुग्णांना चांगले उपचार मिळतील हाच उद्देश आहे.तसेच सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज करिता 5 कोटींची विशेष तरतुद करण्यात आली आहे. 
 
पाणी पुरवठा विभागासाठी महसूली तरतूद 352 कोटी 31 लाख, भांडवली कामासाठी 788 कोटी 57 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली. केंद्र सरकारच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे.यासाठी 990 कोटी रुपये मंजूर झाले असून महापालिकेच्या हिश्श्याचे 150 कोटीची तरतूद करण्यात आली.
 
24 तास समान पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाईप लाईन टाकणे, नव्या पाण्याच्या टाक्या उभारणे. या सर्व कामासाठी 302 कोटींची तरतुद करण्यात आली. एचसीएमटीआर चा 35 किलोमीटर लांबीचा रस्ता ताब्यात घेण्यात येणार आहे.
 
मिळकत कर विभागासाठी 1 हजार 333 कोटी 60 लाख रुपयांचे ठेवले असून सर्व मिळकतीचे जीआयएस मॅपिंगद्वारे सर्व्हेक्षण होणार आहे. यामुळे 1 हजार 718 कोटींचे वसुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 
 
बांधकाम परवनगी आणि विकास शुल्क विभागा मार्फत 1 हजार 25 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समुद्री जैव विविधता केंद्र उभारण्यासाठी 1 कोटीची विशेष तरतुद करण्यात आली.  शिवसृष्टी प्रकल्पासाठी 10 कोटीची विशेष तरतुद करण्यात आली. गणेश उत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करित आहे.या उत्सवासाठी 2 कोटी रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली.
 
पश्चिम पुणेच्या भागात नवीन महापालिकेचे सुसज्ज असे हॉस्पिटल उभारण्यासाठी 5 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. पुणे शहराला दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. हे लक्षात घेता कुंडलिका नदीतून वाया जाणारे पाणी अडवून वरसगाव धरणामध्ये आणले जाणार आहे.यासाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली.यामुळे किमान 1 टीएमसी चा प्रश्न मार्गी लागण्यास होणार आहे.
 
पीएमपीएमएल आधिक सक्षम करण्यासाठी 145 कोटी रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली.1550 बस खरेदी केली जाणार असून 370 मार्गावर बस ची संख्या वाढवण्यावर भर राहणार आहे. पीएमपीएमएल बससाठी 13 डेपो नव्याने उभारण्यात येणार आहे.यासाठी 2 कोटींची विशेष तरतुद केली  आहे.  प्रायोगिक रंगभूमीसाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.
घनकचरा विभागामार्फत शहरातील कचरा संकलनासाठी 15 घंटागाड्या,कचरा वाहतुकीसाठी 40 गाड्या कंटेनरसह त्याचबरोबर 200 गाड्या वाहतुकीसाठी भाड्याने घेण्याचे नियोजन आहे. उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोमध्ये 750 टनाचा प्रकल्प उभारला जाणार आहे.
 
मोशी आणि पिंपरी सांडस येथील जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याससाठी आणि तेथील कामे करण्यासाठी 78 कोटी 45 लाख रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली आहे.  मेट्रो प्रकल्पासाठी फक्त 50 कोटीची तरतुद करण्यात आली. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा ई लर्निग करण्यासाठी 6 कोटीची विशेष तरतुद करण्यात आली आहे.
 
पुणे शहराचा केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समावेश झाला आहे.या अंतर्गत 51 प्रक्ल्पांचे कामे केली जाणार असून यासाठी महापालिकेने 50 कोटीची तरतुद केली.   महापालिकेच्या दोन प्रसूतिगृहामध्ये नवजात अर्भक कक्ष विकसित करण्यासाठी 2 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली.
 
आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थीसाठी वसतीगृहे उभारण्यासाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.  महापालिकेच्या शाळामधील विशेष नैपुण्य  प्राप्त करणाया विद्यार्थीसाठी लोकमान्य टिळक गुणवत्ता पुरस्कार दिला जाणार असून यासाठी 50 लाख रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली असून   भिडेवाडा दुरूस्ती आणि स्मारक उभारण्याच्या कामासाठी 1 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली.

Web Title: Presenting the budget of Pune Municipal Standing Committee of Rs. 5,912 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.