इंदापूर दूधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:28+5:302021-04-16T04:10:28+5:30
मंगेश पाटील यांना गुढीपाडवाच्या सणादिवशीच हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले होते. त्यानंतर ...
मंगेश पाटील यांना गुढीपाडवाच्या सणादिवशीच हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले होते. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील डॉ. एम. के. इनामदार यांच्याकडे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तेथे तपासणीत त्यांना कोरोना असल्याचे दिसून आले, त्यातच त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगेश पाटील यांनी इंदापूर येथील शिवाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते तसेच इंदापूर लायन्स क्लबचे ते संस्थापक मंडळात होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांनी काही दिवस काम पाहिले होते. सध्या ते इंदापूर दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून काम पाहत होते.
स्वामीराज उद्योग समूहाचे बाळासाहेब (आबा) पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मेघश्याम (नाना) पाटील यांचे ते भाऊ होत.
१५ इंदापूर मंगेश पाटील