महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:03 PM2021-05-27T21:03:41+5:302021-05-27T21:04:04+5:30
कोरोना काळातील अनुशेष भरून काढून मंडळाचे कार्य योग्य स्थितीत आणून ठेवणे हेच प्राथमिक आव्हान असेल.'
पुणे : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिकसदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २९ सदस्यांचीही नियुक्ती यावेळी करण्यात आली.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, 'अध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल मी प्रथम शासनाचे आभार मानतो. यशवंतराव चव्हाण यांनी मंडळाची स्थापना केली. त्यावेळी तयार केलेल्या चौकटीत पुरेशी स्पष्टता आणि परिपूर्णता असल्याने आजवरची मंडळाची वाटचाल सुयोग्य झाली. यापूर्वीही मंडळाला चांगले अध्यक्ष लाभले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, य.दि.फडके यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी राज्य साहित्य संस्कृतीचे मंडळासाठी योगदान दिले.
मंडळाच्या कामकाजाची घडी व्यवस्थित बसल्याने नवीन अध्यक्षांना फारसा त्रास झाला नाही. मंडळातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा वर्गही कार्यक्षम आणि सहकार्य करणारा आहे. नवीन सदस्यांची निवडही चांगली आहे. कोरोनामुळे कामावर काहीसा परिणाम झाला असला तरी प्रकल्प व छपाई हे काम सुरू होते.
कोरोना काळातील अनुशेष भरून काढून मंडळाचे कार्य योग्य स्थितीत आणून ठेवणे हेच प्राथमिक आव्हान असेल.'