‘मसाप’च्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:42+5:302021-07-19T04:08:42+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची ऑनलाईन सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख कार्यवाह ...

As the president of ‘MASAP’, Dr. Re-election of Raosaheb Kasbe | ‘मसाप’च्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड

‘मसाप’च्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड

googlenewsNext

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची ऑनलाईन सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी डॉ. पुरुषोत्तम काळे यांची तर, विभागीय कार्यवाह म्हणून जयंत येलूलकर (अहमदनगर) व डॉ. शशिकला पवार (धुळे-नंदुरबार) यांची आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरील परिषदेचे तिसरे प्रतिनिधी म्हणून प्रा डॉ. तानसेन जगताप (जळगाव) यांची निवड करण्यात आली आहे, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.

प्रा. जोशी म्हणाले, '' वार्षिक सर्वसाधारण सभेत कोरोनामुळे कार्यकारी मंडळाने ठेवलेला पाच वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव सभेने गेल्या पाच वर्षांत साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी बहुमताने मंजूर केला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. कसबे यांच्या सूचनेनुसार दोन वर्षांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यात अ‍ॅड. प्रमोद आडकर, अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, बंडोपंत राजोपाध्ये, दिनेश फडतरे आणि प्रा. सोमनाथ जगताप यांचा समावेश आहे.''

--------------

साहित्य परिषदेकडून मध्यस्थाची नेमणूक नाही

काही व्यक्ती आणि संस्था महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासदत्व मिळवून देतो म्हणून साहित्यप्रेमींकडून अर्ज भरून घेऊन पैसे गोळा करीत आहेत. परिषदेने अशा मध्यस्थांची नेमणूक केली नसून त्यांच्याशी व्यवहार केल्यास त्याला परिषद जबाबदार नाही, असेही प्रा. जोशींनी सांगितले.

Web Title: As the president of ‘MASAP’, Dr. Re-election of Raosaheb Kasbe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.