नितीन बडगुजर यांना राष्ट्रपतिपदक प्रदान
By admin | Published: August 30, 2015 03:07 AM2015-08-30T03:07:42+5:302015-08-30T03:07:42+5:30
गडचिरोलीत नक्षलवादविरोधी मोहिमेत विशेष कामगिरी करत ५ कडव्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे पोलीस निरीक्षक नितीन मुकेश बडगुजर यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते
पुणे : गडचिरोलीत नक्षलवादविरोधी मोहिमेत विशेष कामगिरी करत ५ कडव्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे पोलीस निरीक्षक नितीन मुकेश बडगुजर यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपतिपदक देऊन गौरविण्यात आले.
बडगुजर २०११ ते २०१४ या काळात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अँटी नक्षल आॅपरेशन
विंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
सी ६० पथकाचे प्रमुख होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा राबविल्या. सिदेसुर जंगल परिसरात १२ एप्रिल २०१३ या दिवशी पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. यामध्ये अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवित बडगुजर यांनी ५ कडव्या नक्षलवाद्यांना टिपले.
मूळचे पुण्याचे रहिवासी असलेल्या बडगुजर यांना केवळ ४ वर्षांच्या सेवाकालात शौर्यपदकासह तब्बल ९२ पारितोषिके मिळाली आहेत. त्याचबरोबर २५ हजार रुपये रोख आणि ५ प्रशंसापत्रे देऊन त्यांचा गौरव झाला आहे. पोलीस दलात मानाचे मानल्या जाणाऱ्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्हानेही त्यांचा गौरव झाला आहे. बडगुजर मूळचे नगरमधील दरडवाडी (ता. जामखेड) येथील शेतकरी कुटुंबातील असून, अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहेत. स्वातंत्र्यदिनी त्यांना राष्ट्रपती पारितोषिक जाहीर झाले होते.
(प्रतिनिधी)