प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे तर उपाध्यक्षपदी डॉ.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:51+5:302021-01-02T04:09:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राज्ञपाठशाळा मंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे यांची तर उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्राज्ञपाठशाळा मंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे यांची तर उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची तर सचिवपदी अनिल जोशी व सहसचिवपदी भालचंद्र मोने यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त डॉ. शरद अभ्यंकर होते. यावेळी नवीन कार्यकारिणी घोषित केली. नवीन संचालक मंडळामध्ये डॉ. शंतनू अभ्यंकर, विवेक सावंत, डॉ. भाग्यलता पाटसकर, मोहन काकडे, डॉ. राजेंद्र प्रभुणे, भालचंद्र मोने, मदन प्रतापराव भोसले, डॉ. अनिमिष चव्हाण आणि नंदकुमार बागवडे यांची निवड केली. तसेच वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी, मदनकुमार साळवेकर व शिवाजी राऊत यांची स्वीकृत सदस्यपदी निवड केली आहे.
संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकासाठी नवीन संपादक मंडळाची स्थापना केली असून प्रमुख संपादक म्हणून डॉ. राजा दीक्षित, कार्यकारी संपादकपदी अनिल जोशी यांच्यासह अशोक कृष्णाजी जोशी, किशोर बेडकिहाळ, डॉ. शंतनू अभ्यंकर व डॉ. राजेंद्र प्रभुणे यांची नियुक्ती केली. डॉ. शरद अभ्यंकर हे वयोमानाप्रमाणे संस्थेतून निवृत्त झाले. त्यांच्या मदन भोसले यांच्या हस्ते सन्मान केला.