भरीव निधीसाठी केंद्रावर दबाव
By admin | Published: January 21, 2016 01:16 AM2016-01-21T01:16:22+5:302016-01-21T01:16:22+5:30
गेल्या दोन-तीन वर्षांत सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे हे दुर्दैव आहे. यासाठी राज्याच्या वाट्याला केंद्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत
पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांत सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे हे दुर्दैव आहे. यासाठी राज्याच्या वाट्याला केंद्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी राज्यातील खासदारांना एकत्र करून एक दबावगट करू, असे आश्वासन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषदेत
बुधवारी सर्व शिक्षा अभियानाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैैठक आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.
ही पहिलीच आढावा बैैठक झाली असून, यात जिल्हा परिषद, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अभियानांतर्गत कामांचा आढावा सांगितला. यातून केंद्राकडून या
वर्षी कमी निधी मिळाल्याचे निदर्शनास आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी गेल्या वर्षभरापासून वर्गखोल्यांची मागणी होत आहे. १ हजार २00 वर्गखोल्यांची आवश्यकता असताना फक्त ३ वर्गखोल्या जिल्ह्याला मिळाल्या आहेत. कारण राज्यालाच कमी निधी मिळाल्याचे या वेळी आढळराव पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, की एकूण परिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, केंद्राकडून मिळालेला निधी कमी आहे. त्यामुळे फेब्रुवारीत १0 ते १२ तारखेला अधिवेशन आहे. तसेच फेबु्रवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बजेट असेल. माझ्या नेतृत्वाखाली राज्यातील खासदारांचा एक दबावगट तयार करीत आहोत. हा दबावगट केंद्राच्या शिक्षणमंत्र्यांबरोबर बैैठक करून पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव निधी मिळेल याची काळजी घेणार असल्याचे सांगितले.
या बैैठकीला आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)