विनापरवाना रुग्णालयांना चाप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:44+5:302021-08-25T04:15:44+5:30
विनापरवाना रुग्णालयांना चाप ! बॉम्बे नर्सिग होम ॲक्टनुसार महापालिका कार्यक्षेत्रातील सर्वच खासगी रुग्णालये / नर्सिंग होम्स यांना नोंदणी व ...
विनापरवाना रुग्णालयांना चाप !
बॉम्बे नर्सिग होम ॲक्टनुसार महापालिका कार्यक्षेत्रातील सर्वच खासगी रुग्णालये / नर्सिंग होम्स यांना नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे. काही वेळा खासगी रुग्णालये एकदाच नोंदणी करून कारभार सुरू ठेवतात. काही अपप्रवृत्तींनी तर कोरोना आपत्ती काळात विनापरवाना रुग्णालय उभारून, वैद्यकीय सेवांचा बाजार मांडल्याचे दिसून आले. तर अनेकांनी परवानगीपेक्षा अधिक खाटा वाढवून आहे, त्याच मनुष्यबळात रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या कडक तपासणीमुळे विनापरवाना रुग्णालयांना चाप बसणार आहे.
चौकट २
नूतनीकरणाचे पत्र दर्शनी भागावर आवश्यक
खासगी रुग्णालयांची तपासणी करताना, संबंधित रुग्णालयाने नर्सिंग होम नोंदणी प्रमाणपत्र व नूतनीकरण प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावले आहे का? याची प्राधान्याने तपासणी होणार आहे. अग्निशमन ना-हरकत पत्र, जैववैद्यकीय कचऱ्याचे शास्त्रोक्त वर्गीकरण केले जात आहे का, आंतररुग्णांची सविस्तर नोंद आहे का, रक्तपेढी आहे का, वैद्यकीय सेवांचे दरपत्रक लावले आहे का, पीसीपीएनडीटी, एमटीपी, एईबारबी सुविधांसह, रुग्णहक्क संहितेचा माहिती फलक लावला आहे का, याची तपासणी होणार आहे़
कोट
“राज्य शासनाच्या निर्देषानुसार महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दर सहा महिन्यांनी खासगी रुग्णालयांची नियमित तपासणी करून त्याचा अहवाल मुख्य आरोग्य विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक रुग्णालयाची सविस्तर माहिती यामुळे मिळणार असून विनापरवाना वैद्यकीय सेवा व बोगस डॉक्टरांना आळा बसणार आहे. शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास याची मदत होईल.”
-डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका