ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवले अन् शासनाकडून नुकसान भरपाईचे पावणे आठ कोटी लाटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 04:49 PM2021-08-14T16:49:15+5:302021-08-14T16:50:28+5:30

औरंगाबाद येथील वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करुन पावणे आठ कोटींची रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार समोर...

Pretending to be the chairman and secretary of the trust, Fraud of Rs 8 crore with Waqf Board | ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवले अन् शासनाकडून नुकसान भरपाईचे पावणे आठ कोटी लाटले

ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवले अन् शासनाकडून नुकसान भरपाईचे पावणे आठ कोटी लाटले

Next

पुणे : औरंगाबाद येथील वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करुन ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून शासनाकडून नुकसान भरपाईची पावणे आठ कोटींची रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरुन बंडगार्डन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रादेशिक वक्फ अधिकारी खुस्त्रो खान सर्फराज खान (वय ४९, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इम्तीयाज महंमद हुसेन शेख आणि चाँद रमजान मुलाणी (दोघे रा. रामनगर, येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे ८ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील माण येथे ताबुत इनाम इंडोमेंट ट्रस्ट या मुस्लीम ट्रस्टचे मालकीची सुमारे ८ हेक्टर ५७ जागा आहे. या जमिनीपैकी ५ हेक्टर ५१ आर जमीन शासनाने राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक ४ साठी अधिग्रहण केली. त्याचा मोबदला ९ कोटी ६४ लाख ४२ हजार ५०० रुपये मंजूर केला होता. ही रक्कम ट्रस्टला मिळाली नसल्याने ट्रस्टींनी वक्फ बोर्डाला कळविले. त्यानंतर खान यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. इम्तीयाज शेख यांनी ताबुत इनाम इंडोमेंट ट्रस्टकडे विश्वस्त नियुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याशिवाय आणखी ३ अर्ज दुसर्‍या विश्वस्तांनी दाखल केले होते. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. तरीही इम्तीयाज शेख व चाँद मुलाणी यांनी आपण ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे दाखवून तसेच औरंगाबाद येथील राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे बनावट ना हरकत पत्र उपजिल्हाधिकार्‍यांना सादर केले. सरकारी अधिकार्‍यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून ७ कोटी ७६ लाख ९८ हजार २५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मिळविला. तो ट्रस्टच्या खात्यावर जमा न करता स्वत:चे बँक खात्यात जमा करुन शासनाची व वक्फ मंडळाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आ

Web Title: Pretending to be the chairman and secretary of the trust, Fraud of Rs 8 crore with Waqf Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.