Video: चक्क दुचाकीसमोर चालत आला; सासवडच्या दिवे घाटात बिबट्या दिसला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 01:58 PM2023-09-03T13:58:29+5:302023-09-03T13:59:11+5:30
बिबट्याला जखम झाल्याने तो घाटात चालत आल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले
फुरसुंगी : पुणे सासवड रोडवरील दिवे घाटात बिबट्या दिसला. वन विभागाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले असून सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात ड्रोनच्या साहाय्याने शोध कार्य सुरु आहे.
सकाळी दिवेघाटातील रस्त्यावर बिबट्या लोळत असल्याचा व्हिडिओ तेथून जाणाऱ्या नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर सगळीकडे ही माहिती पसरली. तर काही दुचाकीस्वार यांच्या समोर बिबट्या आला. तो समोर दिसल्याचे पाहून गाडी थांबून ते मागे पळाले. हाही एक व्हिडिओ व्हायरल झाला. या बिबट्याला काही मार लागला आहे. त्याचे रक्त रस्त्यावर पडलेले वनाधिकाऱ्यांना दिसले. तो त्या जखमेतून सावरून रस्त्यावरून खाली डोंगरात उतरला असल्याची शक्यता आहे. तेथून सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी शोधकार्य वनविभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. जर तो सापडला तर त्याच्यावर उपचार करून जंगलात सोडण्यात येणार आहे. जर त्याची तब्येत व्यवस्थित झाली असेल तो तर तिथून निघून जाण्याची शक्यता आहे. असेही वन अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
चक्क दुचाकीसमोर चालत आला; सासवडच्या दिवे घाटात बिबट्या दिसला#Pune#diveghat#leopardpic.twitter.com/QDFQU7odvB
— Lokmat (@lokmat) September 3, 2023