शिक्रापूर परिसरात गॅस सिलिंडरची फसवणूक रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:16+5:302021-05-06T04:11:16+5:30

शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे येथील गॅस एजन्सी चालकांकडून ग्राहकांना देण्यात येणारे गॅस सिलिंडर वजन न करता दिले जातात. गॅस ...

Prevent fraud of gas cylinders in Shikrapur area | शिक्रापूर परिसरात गॅस सिलिंडरची फसवणूक रोखा

शिक्रापूर परिसरात गॅस सिलिंडरची फसवणूक रोखा

Next

शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे येथील गॅस एजन्सी चालकांकडून ग्राहकांना देण्यात येणारे गॅस सिलिंडर वजन न करता दिले जातात. गॅस सिलिंडर पुरविणाऱ्या वाहनांमध्ये वजनकाटा नसतो आणि काही वाहनांमध्ये वजन काटा असला, तरी तो नादुरुस्त असतो. अनेक ग्राहकांनी त्यांच्या घरामध्ये सिलिंडरचे वजन करून पाहिले त्यावेळी वजन कमी भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप शिंदे यांनी केला. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष शिंदे यांनी शिरूर तहसील कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

--

चौकट

--

शिक्रापूर परिसरातील गॅस एजन्सी चालकांकडून फसवणूक होणाऱ्या तक्रारीबाबत शिरूर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाचे प्रमुख नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्याशी संपर्क साधला असता सर्व गॅस एजन्सी चालकांना याबाबत सूचना देण्यात आलेली असून तसे न झाल्यास कारवाई करण्यात येईल.

-ज्ञानदेव यादव, नायब तहसीलदार

--

फोटो क्रमांक : ०५ शिक्रापूर गॅस एजन्सी

फोटो ओळ - शिक्रापूर परिसरात होणाऱ्या गॅस एजन्सीच्या फसवणूक बाबत निवेदन देताना संतोष शिंदे व आदी.)

Web Title: Prevent fraud of gas cylinders in Shikrapur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.