लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:46+5:302021-09-17T04:15:46+5:30

शासकीय डिजिटल माध्यमांवर करणार प्रबोधन शासकीय डिजिटल माध्यमांवर करणार प्रबोधन -- बारामती : लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी ...

To prevent obesity and diabetes | लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी

लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी

Next

शासकीय डिजिटल

माध्यमांवर करणार प्रबोधन

शासकीय डिजिटल माध्यमांवर करणार प्रबोधन

--

बारामती : लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी आता बारामतीकर डॉक्टर पुढाकार घेणार आहेत. लठ्ठपणा, मधुमेह टाळण्यासह यावर आधुनिक उपचाराबाबत नुकतेच आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत एक चर्चासत्र झाले. यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

बारामतीच्या डॉ. राधिका शहा (वाघोलीकर) व डॉ. शशांक शहा ही जबाबदारी पार पाडणार आहेत. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचे प्रमाण गेल्या दोन दशकांत खूपच वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या काळात लठ्ठपणा व मधुमेह यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. दर दहा मृत्यूंमागे चार जणांना लठ्ठपणा किंवा मधुमेह होता. हीच बाब विचारात घेत आंतरराष्ट्रीय पातळीवर फिजिशियन, डाएटिशियन व इतर तज्ज्ञांनी एकत्र येत यावर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई येथे पार पडलेल्या चर्चासत्रात पुण्याच्या लॅप्रो ओबेसो सेंटरचे डॉ. शशांक शहा व ऑर्गनायझिंग सेक्रेटरी बारामतीच्या डॉ. राधिका शहा (वाघोलीकर) व डॉ. पूनम शहा यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या समोर दोन प्रस्ताव मांडले. त्यांनी लहान मुलांमधील लठ्ठपणा व कमी वयात होणारा मधुमेह टाळण्यासाठी शासनासोबत मिळून काही प्रबोधन करण्याची इच्छा व्यक्त केली.

लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी आवश्यक टीप्स डिजिटल मीडियाच्या व्यासपीठावरून त्याबाबतच्या टीप्स देण्याची तयारी डॉ. शशांक, डॉ. पूनम शहा व डॉ. राधिका शहा यांनी दर्शविली. डॉ. टोपे यांनी तातडीने शासनाच्या सर्व डिजिटल व्यासपीठांवरून याबाबतच्या प्रबोधनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. आता विविध संस्था व व्यक्ती यांच्या मार्गदर्शनानुसार या टीप्स तयार केल्या जाणार आहेत.

बारामतीत पर्यावरण संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मोठे काम हाती घेतले आहे. सुनेत्रा पवार अध्यक्षा असलेली एन्व्हॉयर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सेवाभावी संस्था गेल्या १२ वर्षांपासून त्यासाठी कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेत सहभागी प्रत्येक डॉक्टर या पुढील काळात त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सुनेत्रा पवार यांच्यापासून वृक्षारोपणाची प्रेरणा घेत एक झाड भेट देणार आहे.

—————————————————

Web Title: To prevent obesity and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.