पुणे बाजार समितीमध्ये भेंडी, काकडीच्या दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:00 PM2018-12-12T12:00:35+5:302018-12-12T12:01:10+5:30
भाजीपाला : चांगल्या प्रतीच्या भेंडीचे भाव क्विंटलमागे शंभर रुपयांनी घटले.
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढल्याने भेंडी, काकडी, गाजर, कोथिंबीरच्या भावात घट झाली असून, मेथी आणि हरभऱ्याचे भाव टिकून आहेत. भेंडीची ३५९ क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगल्या प्रतीच्या भेंडीचे भाव क्विंटलमागे शंभर रुपयांनी घटले.
काकडीची ४१५ क्विंटल आवक झाली असून, त्याच्या भावात क्विंटलमागे ४०० ते १००० रुपयांनी घट झाली. काकडीला क्विंटलमागे ६०० ते १५०० रुपये भाव मिळाला. गाजराची १ हजार ७६ क्विंटल आवक झाली असून, दीड हजार रुपयांनी घट झाली. गाजराला क्विंटलमागे ८०० ते १४०० रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीची ५० हजार जुडी आवक झाली असून, त्याला शेकडा ३०० ते आठशे रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीच्या भावात शंभर जुडीमागे ४०० रुपयांची घट झाली. मेथीची २५ हजार जुडी आवक झाली. त्यास शंभर जुडीमागे ३०० ते ७०० दर मिळाला.