Pune: लसूण, कोबीसह हिरवी मिरचीला दरवाढीचा तडका; ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:50 AM2023-07-31T08:50:13+5:302023-07-31T08:50:52+5:30

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. ३०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली...

Price hike for green chillies with garlic, cabbage; 90 to 100 truckloads of fruits and vegetables | Pune: लसूण, कोबीसह हिरवी मिरचीला दरवाढीचा तडका; ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक

Pune: लसूण, कोबीसह हिरवी मिरचीला दरवाढीचा तडका; ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक

googlenewsNext

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढली आहे़. त्यामुळे काकडी आणि फ्लॉवरच्या भावात घट झाली आहे तर लसूण आणि कोबीच्या भावात वाढ झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली़.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. ३०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे ८ ते १० टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, इंदूर येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा ३ टेम्पो, कर्नाटक येथून मटार १ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा २ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमुगाची सुमारे १ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे ८ ते १० टेम्पो आवक झाली होती, तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ७०० ते ८०० गोणी, गवार, भेंडी प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सुमारे सहा ते साडेसहा हजार क्रेट्स, हिरवी मिरची २ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ९ ते १० टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे १०० ते १२५ गोणी, मटार २ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा सुमारे ६० ते ६५ ट्रक तर इंदूर, आग्रा भागातून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलाे)

कांदा : १३०-१६०, बटाटा : १४०-२१०. लसूण : ९००-१५००, आले : १०००-१३००, भेंडी : २५०- ३५०, गवार : गावरान व सुरती ३५०-५००, टोमॅटो : ७००-१०००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१६०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ४००-५००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : १००-१४०, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ५००-६००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ३५०-४००, गाजर : २००-२५०, वालवर : ४५०-५००, बीट : १४०-१५०, घेवडा : ४००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००- ३५०, ढेमसे :२५०-३००, मटार : स्थानिक : १५००-१८००, परराज्य: १६००, पावटा : ३००- ३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

Web Title: Price hike for green chillies with garlic, cabbage; 90 to 100 truckloads of fruits and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.