लिंबाचे दर गोणीमागे चाळीस रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:29+5:302021-07-12T04:08:29+5:30

मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात झाली. आवक-जावक कायम असल्याने बहुतांश फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या ...

The price of lemon went up by Rs 40 per bag | लिंबाचे दर गोणीमागे चाळीस रुपयांनी वाढले

लिंबाचे दर गोणीमागे चाळीस रुपयांनी वाढले

Next

मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात झाली. आवक-जावक कायम असल्याने बहुतांश फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत.

रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात केरळ येथून अननस ४ ट्रक, मोसंबी २० टन, संत्री १ टन, डाळिंब ५० टन, पपई ८ टेम्पो, लिंबे २००० गोणी, पेरू ४०० क्रेटस्, चिक्कू शंभर बॉक्स तर खरबुजाची २ टेम्पो इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : १००-२००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १००-३२०, (४ डझन ) : ५० ते १२०, संत्रा : (१० किलो) : ३००-१५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१३०, गणेश : १०-३०, आरक्ता ५-२०. कलिंगड : १२-१५, खरबूज : १२-२०, पपई : १५-२०, चिक्कू (१० किलो) २००-७००, पेरू (२० किलो) : २५०-३५०.

Web Title: The price of lemon went up by Rs 40 per bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.