आळेफाटा उपबाजारात कांद्याला प्रति दहा किलो २२१ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:07+5:302021-07-12T04:08:07+5:30

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातही गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर हे टिकून असून आवक मात्र कमी प्रमाणात होत ...

The price of onion in Alephata sub-market is Rs. 221 per 10 kg | आळेफाटा उपबाजारात कांद्याला प्रति दहा किलो २२१ रुपये भाव

आळेफाटा उपबाजारात कांद्याला प्रति दहा किलो २२१ रुपये भाव

Next

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातही गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर हे टिकून असून आवक मात्र कमी प्रमाणात होत आहे. कांदादर वाढतील, अशी आजही शेतकरीवर्ग अपेक्षा बाळगून आहे. महिनाभरापूर्वी कांद्यास सरासरी चांगला बाजारभाव मिळाला होता. त्यावेळी आवक येथील वाढली होती. रविवारी नऊ हजार कांदा गोणी विक्रीस आल्या असल्याचे सचिव रूपेश कवडे कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.

प्रतवारीप्रमाणे प्रति दहा किलो दर असे एक नंबर गोळा कांदा २०० ते २२१ रुपये, दोन नंबर कांदा १६० ते २०० रुपये, तीन नंबर कांदा ८० ते १६० रुपये.

डाळिंबाला चांगला दर आवक वाढली.

आळेफाटा उपबाजारात रविवारच्या लिलावात दर्जेदार डाळिंबाच्या वीस क्रेटला पाच हजार रूपये असा कमाल दर मिळाला.

डाळिंबाचे पहिल्या टप्प्यातील हंगामाला जून महिन्यात सुरुवात झाली आणि आळेफाटा उपबाजारात आवक चांगली होऊ लागली. डाळींबावरील कीडरोगाने शेतकरी त्रस्त असताना दर्जेदार डाळिंबास मात्र चांगला भाव मिळत आहे. परराज्यांतून डाळिंबास मागणी वाढल्याने भाव चांगला मिळत असल्याचे आडतदार व्यापारी संदीप कोरडे, प्रवीण लेंडे, संजय कुऱ्हाडे, नीलेश भुजबळ, निशिकांत डोमसे यांनी सांगितले. वीस किलो क्रेटला प्रतवारीप्रमाणे मिळालेले दर असे एक नंबर डाळिंब 4500 ते 5000 रूपये दोन नंबर डाळींब 2500 ते 4500 रूपये व तीन नंबर डाळींब 1500 ते 2500 रूपये.

Web Title: The price of onion in Alephata sub-market is Rs. 221 per 10 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.