फ्लॉवर, मटार अन् घेवड्याचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:51+5:302021-09-06T04:12:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात रविवारी फ्लॉवर, मटार अन् श्रावण घेवड्याचे दर वाढले होते. तर शिमला मिरची ...

Prices of cauliflower and peas went up | फ्लॉवर, मटार अन् घेवड्याचे भाव वाढले

फ्लॉवर, मटार अन् घेवड्याचे भाव वाढले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डात रविवारी फ्लॉवर, मटार अन् श्रावण घेवड्याचे दर वाढले होते. तर शिमला मिरची आणि हिरव्या मिरचीच्या भावात घट झाली आहे. अन्य इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर होते. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक कमी होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मार्केट यार्डात ८० गाड्यांची आवक झाली. इतर राज्यातून आलेल्या मालात गुजरात आणि कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश येथून ४ ते ५ टेम्पो गाजर, गुजरात, आंध्र प्रदेश कर्नाटक येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेश आणि भुईमुग शेंग ३ ते ४ टेम्पो, गुजरात येथून १० ते ११ ट्रक लसूण, इंदूर, आग्रा, गुजरात आणि राज्यातील इतर भागातून बटाट्याची ४० ते ५० ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले ११०० ते १२०० गोणी, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, पुरंदर, वाई आणि साताऱ्याहून मटार २०० ते २५० गोणी, कांदा ४५ ते ५० ट्रक, तर भुईमुग शेंग १ हजार पोती इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १३०-१७०, बटाटा : १००-१३०, आले : सातारी १००-२५०, भेंडी : १००-२००, गवार : २००-३००, टोमॅटो : ५०-८०, लसूण : ३५०-९००, दोडका : १००-१५०, हिरवी मिरची : १००-२००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-

२००, काकडी : ८०-१२०, पापडी : २००-२५०, पडवळ : १६०-१८०, प्लॉवर : १२०-१५०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : १००-१५०, नवलकोल : ६०-८०, कारली हिरवी १००-१५०, पांढरी ८०-१००, ढोबळी मिरची : ८०-१२०, तोंडली : कळी २५०-३००, जाड, १४०-१५०, शेवगा : ३५०-४००, गाजर १५०-२२०, वालवर १६०-२२०, बीट : ६०-१००, घेवडा : २५०-३००, घोसावळे : १५०-१६०, ढेमसे : २५०-३००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००- २५०, भुईमूग शेंग : ३००-३५०, मटार : स्थानिक: ८००- ८५०, पावटा : १००-२००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, मका कणीस : ५०-८०, नारळ : शेकडा १०००-१६००.

Web Title: Prices of cauliflower and peas went up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.