कोथींबीर, शेपू, मेथी, चवळीचा दर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:37+5:302021-01-18T04:09:37+5:30
पुणे : मार्केट यार्डात रविवारी (दि.१७) रोजी कोथिंबिरीची एक लाख ३० हजार, मेथीची ४० हजार तर हरभरा गड्डीचे ...
पुणे : मार्केट यार्डात रविवारी (दि.१७) रोजी कोथिंबिरीची एक लाख ३० हजार, मेथीची ४० हजार तर हरभरा गड्डीचे ५० हजार जुडींची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. यामध्ये कोथिबीर, शेपू, मेथी, चवळीचे दर वाढले, तर अंबाडी, मुळे याचे दर घटले आहेत. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कोथिंबीर, शेपू २, मेथी ३, चवळी ५-६ रुपये गड्डीमागे वाढ झाली आहे, तर अंबाडी १, मुळे २ रुपयांनी गड्डीमागे घट झाली आहे.
--
खरबूज, पपई, डाळींब, बोरे, मोसंबी, संत्रा आणि लिंब महागली
खरबूज, पपई, डाळिंब, बोरे, मोसंबी, संत्रा आणि लिंबाच्या दरात १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली, तर कलिंगड, चिकू, अननस, पेरू आणि स्ट्रॉबेरीचे दर स्थिर आहेत. कोणत्याही प्रकारच्या फळांच्या दरात घट झाली नाही.
रविवारी फळबाजारात केरळ येथून अननस ५ ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री २ ते ३ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे दोन हजार गोणी, पेरू ४०० कॅरट, चिकू १ हजार गोणी, खरबुजाची १० ते १५ टेम्पो, बोरे ३५० गोणी, स्ट्रॉबेरी १० ते १५ टन इतकी आवक झाली.
--
फुलांचे दर आणि मागणी स्थिर
मार्केटयार्डातील फूल बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फुलांचे वाढलेले दर संक्रांतीनंतर खाली आले आहेत. सद्य:स्थितीत आवक आणि मागणी कायम असल्याने, सर्व प्रकारच्या फुलांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.