फळभाज्यांची आवक वाढल्याने दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:22+5:302021-09-13T04:09:22+5:30

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटल्याने भावात थोडी ...

Prices fell due to increased inflow of fruits and vegetables | फळभाज्यांची आवक वाढल्याने दर घसरले

फळभाज्यांची आवक वाढल्याने दर घसरले

googlenewsNext

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटल्याने भावात थोडी वाढ झाली. तळेगाव बटाट्याची आवक कमी होऊनही भाव स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगाची काहीही आवक झाली नाही. तर लसणाची आवक किंचित घटूनही भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची आवक वाढली तर टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, वांगी, भेंडी, कारली, ढोबळी मिरची, गवार, दुधी भोपळा, काकडी या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले.पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपू भाजीची आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात बैल,जर्शी गाय,म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल २ कोटी २० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ८०० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत १०० क्विंटलने कमी झाल्याने भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा भाव १६०० रुपयांवरून १७०० रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ९०० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक १०० क्विंटलने घटूनही बटाट्याचा बाजारभाव १,३०० रुपयांवर स्थिर राहिले. लसणाची एकूण आवक १७ क्विंटल होऊनही लसणाला ८,००० रुपये बाजारभाव मिळाला.

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला १,००० ते २,००० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –

कांदा - एकूण आवक - ८०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,७०० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.

बटाटा - एकूण आवक - ९०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,३०० रुपये, भाव क्रमांक २. १,१५० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.

फळभाज्या:

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - १७२ पेट्या ( ४०० ते ८०० रू. ), कोबी - ११७ पोती ( ३०० ते ५०० रू. ), फ्लॉवर - १२५ पोती ( १,००० ते १,५०० रू..),वांगी - ६२ पोती ( १,००० ते २,००० रू.), भेंडी - ६२ पोती ( १,००० ते २,००० रू.),दोडका - ५२ पोती ( ५०० ते १,५०० रू.), कारली - ६२ डाग ( ८०० ते १,२०० रू.), दुधीभोपळा - ४३ पोती ( ५०० ते १,५०० रू.),काकडी - ५४ पोती ( ५०० ते १,५०० रू.), फरशी - ५२ पोती ( १,००० ते २,००० रू.), वालवड - ३३ पोती ( १,५०० ते २,५०० रू.), गवार - ५८ पोती ( २,००० ते ३,००० रू.), ढोबळी मिरची - ६२ डाग ( ५०० ते १,५०० रू.), चवळी - २९ पोती ( १,०००) ते २,०००रू. ), वाटाणा - ७७ पोती ( ६,५०० ते ८,०००रू. ), शेवगा - १४ पोती ( ३,००० ते ४,०००रू. ), गाजर - २२ पोती ( १,००० ते २,००० रू.).

पालेभाज्या

राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ४० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ४०० ते १२०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची ३० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ४०१ ते १,५०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १०१ ते ६०१ रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण १७ हजार ५४५ जुड्या ( ८०० ते १,२०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २६ हजार २६० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), शेपू - एकुण ३ हजार ५२० जुड्या ( ४०० ते ६०० रुपये ), पालक - एकूण २ हजार १५० जुड्या ( ५०० ते ८०० रुपये ).

जनावरे

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्शी गाईंपैकी ४५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ५०,००० रुपये ), १२० बैलांपैकी ७० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३०,००० रुपये ),११० म्हशींपैकी ८० म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रुपये ),४२२० शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेळ्या - मेंढ्यापैकी ३३४० मेंढ्यांची विक्री झाली.(२,००० ते १५,००० )

१२ चाकण

चाकण बाजारात टोमॅटोची आवक झाली.

120921\img-20210912-wa0019.jpg

------------

* फोटो - चाकण बाजारात टोमॅटोची आवक झाली.

Web Title: Prices fell due to increased inflow of fruits and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.