पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:55+5:302021-03-15T04:09:55+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही बाजारभावात मोठी घसरण ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही बाजारभावात मोठी घसरण झाली. तळेगाव बटाट्याची आवक व भावही घटले. भुईमूग शेंगांची आवक वाढल्याने भाव घसरले. लसणाची आवक व भावही स्थिर रहिले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, दोडका,वाटाणा व गाजर या फळभाज्यांची आवक कमी होऊनही बाजारभावात घट झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपू भाजीची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव घसरले.जनावरांच्या बाजारात बैलांच्या संख्येत वाढ झाली,म्हैस, जर्शी गायच्या घट झाली तर शेळ्यांमेंढयांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल ३ कोटी ७० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४१०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९०० क्विंटलने कमी होऊनही कांद्याच्या भावात तब्बल ९०० रुपयांची मोठी घसरण झाली.कांद्याचा बाजारभाव २,४०० रुपयांवरून २,००० रुपयांवर घसरले.
तळेगाव बटाट्याची एकूण ९०० आवक क्विंटल झाली.मागील शनिवारच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने कमी होऊनही बाजारभावात २०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवरून १,२०० घसरले. लसणाची एकूण आवक १५ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुनलेत ही आवक ८ क्विंटलने वाढल्याने बाजारभाव ६,००० रुपयांवर स्थिरावले. भुईमूग शेंगांची १५ क्विंटल आवक होऊनही भाव ६,००० स्थिरावले.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २३३ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला २,५०० ते ३,५०० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा - एकूण आवक - ४,१०० क्विंटल. भाव क्रमांक १. २,००० रुपये, भाव क्रमांक २. १,८०० रुपये, भाव क्रमांक ३. १,५०० रुपये.
बटाटा - एकूण आवक - ९०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,२०० रुपये, भाव क्रमांक २. १,००० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोमॅटो - ५९ पेट्या ( ५०० ते १,००० रू. ), कोबी - १३३ पोती ( २०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - १३० पोती ( ४०० ते ८०० रू.),वांगी - ६३ पोती ( ६०० ते १,२०० रू.). भेंडी - ४८ पोती ( २,५०० ते ३,५०० रू.),दोडका - ३९ पोती ( २,५०० ते ३,५०० रू.). कारली - ४६ डाग ( २,००० ते ३,००० रू.). दुधीभोपळा - ३० पोती ( ६०० ते १,२०० रू.),काकडी - ४७ पोती ( १,००० ते २,००० रू.). फरशी - ४२ पोती ( २,५०० ते ३,५०० रू.). वालवड - २३ पोती ( २,००० ते ४,००० रू.). गवार - १९ पोती ( ४,००० ते ६,००० रू.). ढोबळी मिरची - ४७ डाग ( २,००० ते ३,००० रू.). चवळी - १६ पोती ( २,५००) ते ३,५०० रू. ), वाटाणा - २५५ पोती ( २,००० ते ३,००० रू. ), शेवगा - १८ पोती ( २,००० ते ४,००० रू. ), गाजर - १५२ पोती ( ५०० ते १,००० रू.).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख १५ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १०१ ते ६५० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची १ लाख १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १०१ ते ६०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १०१ ते ५५१ रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रति शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी - एकूण ३१ हजार ५८४ जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), कोथिंबीर - एकूण ३० हजार ९५० जुड्या ( ३०० ते ६०० रुपये ), शेपू - एकुण २ हजार ८५० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), पालक - एकूण ४ हजार २६० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९० जर्शी गायींपैकी ७० गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), १४० बैलांपैकी ११० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रुपये ), १६० म्हशींपैकी ११० म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ११,३५० शेळ्या - मेंढ्यापैकी १०,१८० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना २,००० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
१३ चाकण बाजार
चाकण बाजारात पालेभाज्यांची प्रचंड आवक झाली.