संचारबंदीच्या घोषणेनंतर फळभाज्या, भाजीपाल्याचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:15+5:302021-04-15T04:10:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा ...

Prices of fruits and vegetables have gone up after the announcement of curfew | संचारबंदीच्या घोषणेनंतर फळभाज्या, भाजीपाल्याचे दर कडाडले

संचारबंदीच्या घोषणेनंतर फळभाज्या, भाजीपाल्याचे दर कडाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे मात्र बुधवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागात लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी दरामध्ये तब्बल २०-३० टक्क्यांनी वाढ केली.

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. यामुळेच सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून, रुग्णांना रेमडेसिविर औषधासह व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन बेडदेखील उपलब्ध होत नाहीत.

या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने एप्रिल अखेरपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. शासनाने लाॅकडाऊन जाहीर केला असला तरी अत्यावश्यक सेवा म्हणजे भाजीपाला, किराणा दुकानासह, दूध विक्री सुरूच राहणार आहे. परंतु भाजीपाला खरेदी करण्यासाठी देखील बाहेर पडता येईल का, या धास्तीने बुधवारी सकाळपासूनच लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली.

विक्रेत्यांनी फळभाज्यांमध्ये केली मोठी दरवाढ

मार्केट यार्डात बुधवारी नियमितपेक्षा थोडी अधिक आवक होऊन देखील मागणी वाढल्याने घाऊकमध्ये देखील थोडी दरवाढ झाली, परंतु किरकोळ विक्रेत्यांनी लोकांच्या भीतीचा फायदा घेत फळभाज्यांमध्ये मोठी दरवाढ केली. पंधरा रुपयांची कोथिंबीर गड्डी २५ ते ३० रुपये, तर अन्य फळभाज्यांमध्ये देखील २०-३० टक्क्यांनी दर वाढ केली.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा ०८-१२ २५-३०

बटाटा ०८-१४ ३०-३५

टोमॅटो ०८-१२ ४०-४५

भेंडी २५-३० ४५-५०

गवार ३५-४० ६०-६५

मिरची ३५-५५ ६०-७०

कोथिंबीर १०-१२ २५-३०

मेथी ०७-१९ २०-२५

मटार ५५-६० ८०-९०

Web Title: Prices of fruits and vegetables have gone up after the announcement of curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.