आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:06+5:302020-12-14T04:27:06+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात थोडीशी घट ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात थोडीशी घट झाली.तळेगाव बटाट्याची आवक कमी होऊनही बाजारभावात मोठी घसरण झाली. भुईमूग शेंगांची आवक कमी झाल्याने भाव घसरले, लसूणाची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. फ्लॉवर, कोबी, वाटाणा, गाजराची आवक वाढली तर
टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा व दोडक्याच्या आवक घटूनही फळ भाज्यांच्या बाजार भावात घसरण झाली.पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर,शेपू भाजीची प्रचंड आवक वाढल्याने भाव घसरले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, म्हैस, बैल व शेळ्यांमेंढयांच्या संख्येत वाढ झाली.एकूण उलाढाल ३ कोटी २५ लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५९५ क्विंटलने वाढल्याने कांद्याचे भावात थोडीशी घट झाली. कांद्याच्या भावात तब्बल १०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव ३,५०० रुपयांवरून ३,४०० हजार रुपयांवर स्थिरावले.तळेगाव बटाट्याची एकूण आवक १४०० क्विंटल झाली.गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १२५ क्विंटलने कमी होऊनही बटाट्याच्या भावात १००० रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव ३,६०० रुपयांवरून २,६०० हजार रुपयांवर आला.लसणाची एकूण आवक ११ क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत ३ क्विंटलने घटूनही बाजारभाव स्थिर राहिले.भुईमुग शेंगांची ५ क्विंटल आवक झाली.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ११० क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला २,५०० ते ३,५०० रुपये असा भाव मिळाला.
* शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा - एकूण आवक - १५०० क्विंटल. भाव क्रमांक १. ३,४०० रुपये, भाव क्रमांक २. २,८०० रुपये, भाव क्रमांक ३. २,२०० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १४०० क्विंटल. भाव क्रमांक १. २,६०० रुपये, भाव क्रमांक २. २,४०० रुपये, भाव क्रमांक ३. २,२०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोमॅटो - ३७ पेट्या ( २,००० ते ३,००० रू. ), कोबी - १४२ पोती ( ५,०० ते ९०० रू. ), फ्लॉवर - १४५ पोती ( २०० ते ५०० रु.),वांगी - २२ पोती ( १,००० ते २,००० रु.). भेंडी - २६ पोती ( १,५०० ते २,५०० रु.),दोडका - २० पोती ( १,००० ते २,००० रु.). कारली - १९ डाग ( १,५०० ते २,५०० रु.). दुधीभोपळा - १७ पोती ( ४०० ते ८०० रु.),काकडी - २५ पोती ( ५०० ते १,००० रु.). फरशी - ५ पोती ( २,००० ते ३,००० रु.). वालवड - १२ पोती ( २,००० ते ३,००० रु.). गवार - ७ पोती ( २,००० ते ३,००० रू.), ढोबळी मिरची - २७ डाग ( १,००० ते २,००० रु.). चवळी - ४ पोती ( २,०००) ते ३,००० रुपये ), वाटाणा - २५९ पोती ( २५०० ते ३,००० रुपये ), शेवगा - ३ पोती ( ५,००० ते ७,००० रुपये ), गाजर - २६ पोती ( १,५०० ते २,५०० रु.).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख ७० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १५१ ते ६०१ रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची १ लाख ८० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १०१ ते ५०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची एकूण आवक ७० हजार जुड्या झाली असून, या जुड्यांना १०१ ते ४५१ रुपये असा भाव मिळाला.
शेलपिंपळगाव येथील उपबाजारात मेथीची १ हजार ५०० जुड्यांची आवक होऊन मेथीला ३०१ ते ७०१ रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची २ हजार २०० जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना २०० ते ४०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी - एकूण ३६ हजार ९५० जुड्या ( १०० ते ४०० रुपये ), कोथिंबीर - एकूण ३४ हजार ५१० जुड्या ( १०० ते ३०० रुपये ), शेपू - एकुण ६ हजार ९५० जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), पालक - एकूण ४ हजार ७६० जुड्या ( २०० ते ४०० रुपये ).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७० जर्शी गायींपैकी ४२ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४८,००० रुपये ), १५५ बैलांपैकी १०५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३५,००० रुपये ), १९० म्हशींपैकी १५५ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६५,००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९७७० शेळ्या - मेंढ्यापैकी ८८६० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
चाकण बाजारात फ्लॉवरचा सुरु असलेला लिलाव
१३ चाकण