Pune | वाढत्या चटक्याबराेबरच वाढले कलिंगड, खरबुजाचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:43 PM2023-02-20T14:43:54+5:302023-02-20T14:47:10+5:30

केरळमधून आले ६ ट्रक अननस...

prices of Kalingad and Melon have increased with increasing speed | Pune | वाढत्या चटक्याबराेबरच वाढले कलिंगड, खरबुजाचे दर

Pune | वाढत्या चटक्याबराेबरच वाढले कलिंगड, खरबुजाचे दर

googlenewsNext

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याचा चटका वाढीस लागला आहे. त्यामुळे कलिंगड, खरबुजासारख्या फळांना मागणी वाढल्याने त्यांच्या दरातही सरासरी प्रतिकिलाे २ रुपयांनी दरवाढ झाल्याचे रविवारी मार्केट यार्ड फळ बाजारात दिसून आले.

सोलापूरच्या बोरांचा हंगाम संपत येत असल्याने बोराच्या दरातही सुमारे दहा टक्क्यांनी वाढ असली, तरी बाजारात चांगल्या दर्जाची पपई नसल्याने तिच्या मागणी अभावी पपईचे भाव किलोमागे दाेन रुपयांनी घसरल्याचे दिसून आले.

केरळमधून आले ६ ट्रक अननस

रविवारी (दि. १९) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून ६ ट्रक अननस दाखल झाले असून, ३० टन संत्री, ४० ते ५० टन मोसंबी, १५ ते २० टन डाळिंब, १० ते १५ टेम्पो पपई, सुमारे दीड हजार ते दोन हजार गोणी लिंबे, ३०० ते ४०० क्रेटस पेरू, ३० ते ४० गाड्या कलिंगड, २० ते २५ गाड्या खरबूज आणि २ ते ३ पाेती इतकी बाेरांची आवक झाली.

असे हाेते फळांचे भाव

लिंबे (प्रतिगोणी) : ४००-१२००, अननस : १००-५००, मोसंबी : (३ डझन) : २००-४००, (४ डझन) : ४०-१६०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८०-२००, गणेश : १०-४०, आरक्ता २०-८०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, पेरू (२० किलो) : ४००-५००, चिक्कू (१० किलो) : १००-५५०, बोरे (१० किलो) : चेकनट : १०००-१२००, चण्यामण्या : ७००-८००. द्राक्षे (१० किलो) सुपर सोनाका ५००-६००, सोनाका ४५०-५५०, माणिकचमन ३००-४५०, जम्बो ५००-८००, शरद ४५०-६००.

Web Title: prices of Kalingad and Melon have increased with increasing speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.