डाळींचे भाव पुन्हा तेजीत

By admin | Published: March 20, 2017 04:29 AM2017-03-20T04:29:53+5:302017-03-20T04:29:53+5:30

आयातीवर शुल्क आकारण्याची शक्यता गृहित धरून सट्टेबाजांकडून डाळींची विक्री चढ्या भावाने करण्यास सुरूवात झाली आहे.

Prices of pulses rose again | डाळींचे भाव पुन्हा तेजीत

डाळींचे भाव पुन्हा तेजीत

Next

पुणे : आयातीवर शुल्क आकारण्याची शक्यता गृहित धरून सट्टेबाजांकडून डाळींची विक्री चढ्या भावाने करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या तुरडाळीसह इतर डाळींचे भाव सध्या तेजीत आहेत. मागील आठवडाभरात डाळींच्या भावात क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली.
गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागील आठवडाभरात डाळींचे भाव तेजीत राहिले. मागील महिन्यापर्यंत तुरडाळ, हरभराडाळ, उडीद डाळ, मुगडाळ, मसुरडाळीचे भाव मोठ्या प्रमाणात खाली उतरले होते. तुरडाळीचे भाव घाऊक बाजारात क्विंटलमागे ६००० रुपयांपर्यंत घसरले होते. इतर डाळींच्या भावात आवाक्यात आले होते. स्थानिक भागात झालेले डाळींचे मुबलक उत्पादन तसेच परदेशातूनही होत असलेली मोठी आवक यामुळे भाव कमी झाले होते. मागील वर्षापर्यंत सर्वच डाळींनी शंभरी ओलांडली होती. तेजी रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Prices of pulses rose again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.