कलिंगड, खरबूज अन् पपईचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:49+5:302021-09-06T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे कलिंगड, खरबूज आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डात कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली. तर चिक्कू, पेरू, सीताफळ, डाळिंब, संत्रा, मोसंबी आणि लिंबांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पेरू ५०० क्रेट, चिक्कू दोन हजार बॉक्स, कलिंगड पाच ते सहा टेम्पो, खरबूज दोन ते तीन टेम्पो, अननस ४ ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब ४० ते ५० टन, लिंबू दीड ते दोन हजार गोणी इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रतिगोणी) : २००-५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१४०,
गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : ११०-२२०, (४ डझन) : ४० ते १००, संत्रा : (१० किलो) : १००-५००, कलिंगड : १०-१२, खरबूज : २०-२२, पपई : १२-२५, चिक्कू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : २००-३००.
------------------------------------
फोटो : मार्केट यार्डात रविवारी कलिंगड, खरबूज आणि पपई दर वाढले होते.