‘प्राईड ऑफ बीएमसीसी’, ‘बीएमसीसी गुरुवर्य पुरस्कार’ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:11+5:302021-08-25T04:15:11+5:30
पुणे : बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार यंदा प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे ...
पुणे : बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार यंदा प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि उद्योगपती विजय पुसाळकर यांना, तर स्वरानंद संस्थेचे प्रमुख प्रा. प्रकाश भोंंडे यांना 'बीएमसीसी गुरुवर्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी (दि.२८) सांयकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
बीएमसीसीच्या प्राचार्या सीमा पुरोहीत व बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण मंगळवारी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. यावेळी बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे सहसचिव किशोर लोहोकरे, दिनकर अष्टेकर, सुरेश केकाणे, बाळासाहेब गांजवे, सचिन नाईक, सुहास धारणे, संजय साबळे आदी उपस्थित होते.
सीमा पुरोहीत म्हणाल्या, बीएमसीसी महाविद्यालयाच्या सभागृहात येत्या २८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅपरेटिव्ह (एम.एस.सी.) चे अध्यक्ष ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
अरुण निम्हण म्हणाले, या समारंभात बाळासाहेब सरपोतदार पुरस्काराने सिने-नाट्य कलाकार श्रीराम पेंडसे यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच वरुणराज भिडे पुरस्काराने पत्रकार श्रद्धा सिदीड, कांता मगर पुरस्काराने माजी रणजीपटू श्रीकांत जाधव, शिवराम फळणीकर पुरस्काराने रिचा चोरडिया आणि शिवानी सातव, वाणिज्य व उद्योजक पुरस्काराने उद्योजक नितीन देशपांडे यांना, हुतात्मा कुणाल गोसावी पुरस्काराने ब्रिगेडीयर सुनील लिमये आणि विशेष पुरस्काराने राष्ट्रपती पदक विजेते ए.सी.पी. क्राईम पुणेचे सुरेंद्र देशमुख यांना तर समाजसेवक कालीदास मोरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
------------------------