परंपरांचा अभिमान बाळगला जावा
By admin | Published: January 9, 2017 03:25 AM2017-01-09T03:25:18+5:302017-01-09T03:25:18+5:30
अभिमान बाळगाव्यात अशा गोष्टी आपल्याकडे खूप आहेत. मात्र, परंपरांचा अभिमान बाळगला जात नाही. संगीतसुद्धा आपल्याला परंपरेतून मिळालेली एक देणगी आहे.
पुणे : अभिमान बाळगाव्यात अशा गोष्टी आपल्याकडे खूप आहेत. मात्र, परंपरांचा अभिमान बाळगला जात नाही. संगीतसुद्धा आपल्याला परंपरेतून मिळालेली एक देणगी आहे. या परंपरेचा अभिमान बाळगायला हवा, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
कलापिनी, गानशिल्प व एसएनडीटी कॉलेज या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्नाद संगीत मैफलीचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. देखणे बोलत होते.
गानवर्धन संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी, पं. उमेश मोघे, डॉ. शुभांगी बहुलीकर, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, बाळासाहेब धंवर मंचावर होते.
ज्ञानेश्वरांइतके सुंदर गाणारे कुणी नव्हते. नामदेवांच्या कीर्तनात ज्ञानेश्वर गायचे, मोठ-मोठ्या लोकांना कीर्तनाचे आकर्षण होते. अध्यात्माचा आविष्कार संगीतातून येतो. प्रज्ञेची अनुभूती जेव्हा येते, तेव्हा ती व्यक्ती पंडित होते, असे डॉ. देखणे म्हणाले.
(प्रतिनिधी)