कामगार कर्तृत्वाचा गौरव

By admin | Published: May 3, 2017 01:36 AM2017-05-03T01:36:12+5:302017-05-03T01:36:12+5:30

महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या

The pride of the workers' duty | कामगार कर्तृत्वाचा गौरव

कामगार कर्तृत्वाचा गौरव

Next

पिंपरी : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने उपक्रम राबविण्यात आले. कामगारांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मनोरंजन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रभाग स्तरावरील कष्टकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संभाजीनगर येथील वडार मजूर शिल्पास अभिवादन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, नगरसदस्या निकिता कदम, मीनल यादव, शर्मिला बाबर, प्रियांका बारसे, यशोदा कोहिनवार, नगरसदस्य सुरेश भोईर, चंद्रकांत नखाते, राजेंद्र गावडे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रवीण तुपे, रवींद्र दुधेकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक पवन साळवे, सहायक आयुक्त मिनिनाथ दंडवते, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, विशाल कांबळे, प्रदीप पुजारी, वैद्यकीय अधीक्षक मनोज देशमुख, प्रशासन अधिकारी जयश्री काटकर, रेखा गाडेकर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहायक आरोग्याधिकारी उपस्थित होते.
कष्टकऱ्यांचा गौरव
महापालिका व वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील वडार मजूर शिल्पाला महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते भरत विटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी माजी महापौर आझम पानसरे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका मंगला कदम, तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, नगरसेवक संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भरत विटकर, नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अमित गोरखे, शिवसेनेचे विभागप्रमुख विशाल यादव, डॉ. श्रावण रॅपनवाड, सुधीर पवार, पांडुरंग लष्करे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. श्रावण रॅपनवाड, उद्योजक मारूती धोत्रे, भालचंद्र लष्करे, महाराष्ट्र दारूबंदीच्या प्रणेत्या संगीता पवार, जिल्हा तांत्रिक शिक्षण विभागाचे सुधीर पवार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गुजर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे शिल्पकार शिवराम पवार, शिवाजी पवार, हौसाबाई पवार, भीमू जाधव, चंद्राबाई जाधव, भीमराव मंगळवेढेकर, शंकर शिंदे, हिरामण धोत्रे, शिवाजी जाधव, मालन जाधव, नामदेव जाधव, शांता जाधव, फुलाबाई धोत्रे, जनाबाई धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
समाजकल्याण व्यसनमुक्ती पुरस्कर्ता रामदास पाटील, सोलापूरचे प्राध्यापक दिगंबर घोडके, लेखक सतीश पवार, विनायक लष्करे, डॉ. अनिता मोहिते, ललिता धनवटे, हरिभाऊ लष्करे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांचाही महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते सत्कार झाला.
विद्यापीठात ध्वजवंदन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल पवार, वसतिगृह प्रमुख डॉ. टी. डी. निकम, डॉ. वर्षा वानखेडे यांच्यासह विविध विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी होते. (प्रतिनिधी)

फळवाटप, गुलाबपुष्पाने स्वागत

अ क्षेत्रीय कार्यालयामध्ये वाहतूकनगरी, किवळे मनपा शाळा, कचरा वाहतूक विभाग, शंकर शेट्टी उद्यान, तसेच संत तुकाराम व्यापारी संकुल येथे कामगार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सह आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मिनीनाथ दंडवते, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुर्गुडे, सहायक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक डी. एस. सासवडकर उपस्थित होते.
ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चापेकर चौक येथे मनपा शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. नगरसदस्य नामदेव ढाके, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सहायक आरोग्याधिकारी के. डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक कुमार पारोल, आर एन भाट, आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. चापेकर चौकामधून जाणा-या मुख्य रस्त्यांची साधारण एक किलोमीटरपर्यंत साफसफाई या वेळी कर्मचाऱ्यांनी केली. थेरगाव गावठाण, गणेशनगर, खिंवसरा पाटील व्यायामशाळा, वाकड गावठाण, तसेच आरोग्य कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
क क्षेत्रीय कार्यालयातील कामगारांचा कामगार दिन लोखंडे सभागृह, सांगवी मनपा शाळेमध्ये आयोजित करण्यात आला. सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर एम भोसले, बेद, विविध संस्था, बीव्हीजी संस्थेचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
ड क्षेत्रीय कार्यालयात सहायक आरोग्याधिकारी विनोद बेंडाळे यांच्या हस्ते पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव या आरोग्य कार्यालयात कर्मचा-यांना फळवाटप, मिठाईवाटप, गुलाबपुष्प देण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यालयात मोशी, कीटकनाशक कार्यालय-भोसरी, अग्निशमन केंद्र, इंद्रायणीनगर, बॅडमिंटन हॉल येथे सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक प्रभाकर तावरे, राजेंद्र साबळे, अभिजीत गुमास्ते यांनी कामगार दिन कर्मचा-यांसमवेत साजरा केला. पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य संजय नेवाळे, योगिता नागरगोजे,
क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, आशा दुर्गुडे,
सहायक आरोग्याधिकारी डी.जे. शिर्के, एम.एम. शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत स्पाईन रोड येथे कामगार दिन उत्साहात साजरा झाला. तसेच फ क्षेत्रीय कार्यालयातील कीटकनाशक विभाग, रुपीनगर, तळवडे गावठाण आरोग्य कार्यालयात कर्मचा-यांनाफळे, मिठाई, गुलाबपुष्प देण्यात आले.

Web Title: The pride of the workers' duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.