धक्कादायक .. आजारपण बरे करण्याचा बहाण्याने सात्विक पूजा करा सांगत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:31 AM2021-03-16T10:31:10+5:302021-03-16T10:32:05+5:30

  पत्नीचा आजार मुलाचे लग्न व घरातील अडचणी दूर होतील, असे म्हणून सात्विक पूजा करावी लागेल असे सांगितले. त्यासाठी ...

Priest cheats pimpri residents by saying he will cure patient by doing pooja | धक्कादायक .. आजारपण बरे करण्याचा बहाण्याने सात्विक पूजा करा सांगत फसवणूक

धक्कादायक .. आजारपण बरे करण्याचा बहाण्याने सात्विक पूजा करा सांगत फसवणूक

Next

 

पत्नीचा आजार मुलाचे लग्न व घरातील अडचणी दूर होतील, असे म्हणून सात्विक पूजा करावी लागेल असे सांगितले. त्यासाठी सहा लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथील रावेत येथे २०१८ ते ३० एप्रिल २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. 

विनेश भिकू पाटणे (वय ५०, रा. रोहा, रायगड), शुभांगी सुरेंद्र मगरे (वय ४०, रा. नाहूर), सुनील महादेव घारे (वय ६०, रा. लोणावळा), सुरेंद्र मगरे (रा. नाहूर), राजश्री चाफे (वय ४५, रा. कल्याण), विनोद पांड्या (वय ५५, रा. मुलूड), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अर्जुन हनुमंत कालेकर (वय ६४, रा. सिल्व्हर पाम ग्रोव्ह सोसायटी, रावेत) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पत्नीला लवकर बरे करू, असे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. त्यासाठी ९८ हजार रुपये धनादेशाद्वारे तसेच दोन लाख दोन हजार रुपयांची रोख रक्कम वेगवेगळ्या तारखेला घेतले. तुमच्या पत्नीचा आजार व मुलाचे लग्न व इतर घरातील अडचणी दूर होतील. त्यासाठी रत्ने व पैडल करून त्याची सात्विक पद्धतीने पूजा करून देतो, असे सांगून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. पैडल व रत्ने यासाठी तीन लाख ५० हजार रुपये रोख घेतले. मात्र त्याचा कोणताही परिणाम न जाणवल्याने फिर्यादीने पैसे परत मागण्यासाठी आरोपी यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. आरोपी यांनी फिर्यादीचा फोन घेण्यास टाळाटाळ करून त्यांची सहा लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करून विश्वासघात केला. 

फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जावरून चौकशी करून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Priest cheats pimpri residents by saying he will cure patient by doing pooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.