वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लसीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:32+5:302021-05-05T04:17:32+5:30
शासनाने लसीकरण वितरणाचे काटेकोर नियोजन करून ते नियोजन पाळावे असा सूर सामान्य नागरिकांतून उमटत आहे. कारण, कोरोना प्रतिबंध उपाय ...
शासनाने लसीकरण वितरणाचे काटेकोर नियोजन करून ते नियोजन पाळावे असा सूर सामान्य नागरिकांतून उमटत आहे. कारण, कोरोना प्रतिबंध उपाय म्हणून सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे लसीकरण.
दिवसेंदिवस कोरोनाचा वाढतात प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे, त्याला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत असून लसीकरण सुरळीतपणे सुरू राहावे अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
वाडा परिसरातील देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.काही नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ते दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत आहे, तर काही नागरिक पहिला डोस मिळावा म्हणून प्रतीक्षा करत आहेत. शासनाने नागरिकांच्या प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.