सौरऊर्जेने उजळताहेत प्राथमिक आरोग्य केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:06 AM2019-02-23T04:06:29+5:302019-02-23T04:12:20+5:30

सुजाता पवार : सात पंचायत समितीमध्येही प्रकल्प कार्यान्वित

The primary health centers are brightening solar energy | सौरऊर्जेने उजळताहेत प्राथमिक आरोग्य केंद्रे

सौरऊर्जेने उजळताहेत प्राथमिक आरोग्य केंद्रे

Next

शिरूर : जिल्ह्यातील पन्नास प्राथमिक आरोग्य केंद्रात; तसेच सात पंचायत कार्यालयांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी येथे सांगितले. पुणे जिल्हा परिषद
समाजकल्याण विभागाच्यावतीने मागासवर्गीय घटकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सतरंजी व संगीतसाहित्याचे वाटप सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पंचायत समितीचे सभापती विश्वासराव कोहोकडे, जि. प. सदस्य राजेंद्र जगदाळे, गटविकास अधिकारी संदीप जठार, सोमनाथ बेंद्रे, विलास कर्डिले, गणेश करपे सरपंच, उपसरपंच तज्ञिका कर्डिले, तुकाराम गव्हाणे, तुषार दसगुडे, माजी सरपंच राजेंद्र कटके, अतुल बेंद्रे, गजानन जगताप, नाना पाचर्णे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, राजेंद्र झेंडे, प्रदीप ठोंबरे आदींसह विविध गावांचे ग्रामसेवक उपस्थित होते.
जिल्ह्यातील शिरूर, दौंड, आंबेगाव, बारामती, दौंड, पुरंदर, वेल्हा या पंचायत समिती कार्यालयांमध्येतसेच जिल्ह्यातील पन्नास प्राथमिक आरोग्य केंद्रांत
एक कोटी ९३ लाख रुपये
खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून लवकरच
हा प्रकल्प कार्यान्वित होणार
असल्याचे पवार यांनी
सांगितले. शिरूरमधील चार प्राथमिक आरोग्य केंद्राचा यात समावेश आहे.

तालुक्यात भजनसाहित्याचे वाटप

४यावेळी समाजकल्याण समिती सभापती सुरेखा चौरे यांच्या सहकार्यातून समाजकल्याण विभागातर्फे तालुक्यातील निर्वी, शिरसगाव काटा, कोळगाव डोळस, आंबळे, तर्डोबाचीवाडी, गोलेगाव, चिंचणी, शिरूर ग्रामीण, सरदवाडी, अण्णापूर या गावांमधील मागासवर्गीय समाजमंदिरांसाठी तबला, पेटी व इतर साहित्य व वडगाव रासाई, शिरसगाव काटा, मांडवगण फराटा, तांदळी, तर्डोबाचीवाडी, आंबळे, न्हावरे या गावातील मागासवर्गीय घटकांसाठी पवार यांच्या हस्ते सतरंजीवाटप करण्यात आले.
 

Web Title: The primary health centers are brightening solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे