सीईटी-सेलकडून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:49+5:302021-01-03T04:13:49+5:30

पुणे : राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात अभियांत्रिकी, फार्मसी, ...

Primary quality list published by CET-Cell | सीईटी-सेलकडून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द

सीईटी-सेलकडून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द

Next

पुणे : राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांची नोंदणी संपली असून या आठवड्याभरात प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. सीईटी सेलने शनिवारी अभियांत्रिकी, फार्मसी पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द केली असून विद्यार्थ्यांना त्यावर येत्या ३ आणि ४ जानेवारी रोजी हरकती, सूचना नोंदविता येणार आहेत.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील १ लाख १८ हजार ३९० विद्यार्थ्यांनी तर फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ८७ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द केली असून विद्यार्थ्यांना अर्जातील चुका सुधारणे, कागदपत्र जमा करणे यासाठी ३ आणि ४ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. येत्या ६ जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना ७ जानेवारीपासून पहिली प्रवेश फेरीतून प्रवेश देण्यास सुरू केली जाणार आहे.

आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्तायादी या पूर्वीच जाहीर झाली असून शनिवारी (दि.२) हरकती नोंदविण्याची मुदत संपली आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्तायादी येत्या ४ जानेवारी रोजी प्रसिध्द होणार आहे. तसेच येत्या ५ जानेवारीपासून पहिली फेरी राबविली जाणार आहे. बॅचरल ऑफ फाइन आर्ट या पदवी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत आक्षेप नोंदवण्याची रविवारी (दि.३) शेवटची संधी दिली आहे. तर, येत्या ५ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होणार आहे.

Web Title: Primary quality list published by CET-Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.