अखेर ठरलं ! पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला तर १०० देशांचे राजदूत ४ डिसेंबरला पुण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 07:17 PM2020-11-24T19:17:03+5:302020-11-24T19:18:07+5:30

कोरोना लस तयार करणाऱ्या सीरम व जिनोव्हा कंपनीला भेट देणार 

Prime Minister Modi will arrive in Pune on November 28 and ambassadors of 100 countries on December 4 | अखेर ठरलं ! पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला तर १०० देशांचे राजदूत ४ डिसेंबरला पुण्यात येणार

अखेर ठरलं ! पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला तर १०० देशांचे राजदूत ४ डिसेंबरला पुण्यात येणार

googlenewsNext

पुणे :  संपूर्ण जगाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणा-या पुण्यातील " सीरम  इन्स्टिट्यूट " व " जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स" कंपनीकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील तब्बल शंभर देशाचे राजदूत ४ डिसेंबर रोजी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असून, हे सर्व राजदूत दोन गटांमध्ये दोन्ही ठिकाणी भेट देणार असल्याची अधिकृत माहिती जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. 

कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असून, चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यामुळेच हे सर्व राजदूत २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येऊन सीरम आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार होते. दरम्यान राजदूत येणार म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील २८ नोव्हेंबरला भेट देणार म्हणून प्रशासनाकडून प्रचंड तयारी सुरू होती. परंतू राजदूत येऊन गेल्यानंतर पंतप्रधान येणे योग्य नसल्याने प्रथम २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.  या संदर्भातील मोदी यांचा प्राथमिक दौरा आला असून, अंतिम दौरा अद्याप आला नसल्याचे नाटेकर यांनी सांगितले. यामुळेच राजदूत यांचा दौरा आता २७ नोव्हेंबर ऐवजी ४ डिसेंबर करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या दौऱ्यानुसार ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथून एअर फोर्सच्या विमानाने ९८ देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे १०-१५ वाजता दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार असून, याचा अंतिम दौरा अद्याप आला नाही. त्यानंतर दोन गटामध्ये हे राजदूत प्रथम सीरम आणि जिनोव्हा कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी रात्री ८-१५ वाजता पुन्हा विशेष विमानानेच दिल्लीला रवाना होणार आहेत.

Web Title: Prime Minister Modi will arrive in Pune on November 28 and ambassadors of 100 countries on December 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.