...म्हणून आता पंतप्रधान मोदींनाही पुणे हवेहवेसे वाटू लागले आहे : सुप्रिया सुळेंची मिश्किल टिपण्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 05:01 PM2020-11-27T17:01:44+5:302020-11-27T17:09:33+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून ते सिरम इन्स्टिट्यूटला देखील भेट देणार आहेत.
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते कोरोनावरील लस निर्माण करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. तसेच अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेली कोरोनावरील लसची निर्मिती व वितरण प्रक्रिया देखील जाणून घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेँद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे या पुणे पदवीधर निवडणुकीतील महविकास आघाडीच्या उमेदवार असलेले अरुण लाड यांच्या प्रचारार्थ त्या इंदापूर इथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून ते सिरम इन्स्टिट्यूटला देखील भेट देणार आहेत. मात्र आपले महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन बरोबर वर्षपूर्ती होत असताना देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात कोरोना लसीवर जे काही महत्वपूर्ण काम होत आहे ते पाहण्यासाठी येत आहे यापेक्षा आपल्या सरकारचे यश काय असणार आहे.? तसेच पंतप्रधान हे वेगळ्या विचारांचे असले तरी त्यांनाही आता पुणे हवंहवंस वाटू लागले आहे, अशी मिश्किल टिप्पणी देखील सुळे यांनी यावेळी केली.
रिकामी भांडीच जास्त आवाज करतात.. सुप्रिया सुळेंचा विरोधी पक्षाला टोला
आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आमची आहे कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही. परंतु, काही लोक सारखे सारखे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असे बोलत असतात. त्यांच्या बोलण्याची मला फार गंमत वाटते. पण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात मात्र भरलेली भांडी कधीही आवाज करत नाही. अशा शब्दात सुळे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे.
तुम्हाला पाहिजे तितका आवाज करा. आणि समजा आमचे महाविकास आघाडी सरकार पडले तर पुढे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. पण तूर्तास तरी आमचे सरकार स्थिर असून ते आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल असा ठाम विश्वास देखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.