भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 07:10 PM2019-12-08T19:10:58+5:302019-12-08T19:16:39+5:30

रुग्णालयातून निघताना  'अरुण' निघतो रे.. असे म्हणताना मोदी थोडे भावनाविवश झाले होते..

Prime Minister Narendra Modi meets BJP leader Arun Shourie at hospital | भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट 

भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट 

Next

पुणे: गेल्या आठवड्याभरापासून रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मोदी यांनी शौरींच्या प्रकृतीची विचारपूस केली. 
   मोदी आणि शौरी यांना संवाद साधण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एकांत दिला होता. मोदी आणि शौरी यांची अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे.दोघे आठवणीमध्ये रमले होते. एकमेकांशी बोलताना दोघेही एकेरी उल्लेख करताना दिसत होते. जवळपास पंधरा मिनिटे दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. रुग्णालयातून निघताना  'अरुण' निघतो रे.. असे म्हणताना ते थोडे भावनाविवश झाले होते, असे रुग्णालयाचे न्यूरॉसर्जन डॉ सचिन गांधी यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.


   गेल्या रविवारी अरुण शौरी यांना लवासा येथील घराच्या अंगणात फिरताना भोवळ आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. त्यामुळे त्यांच्या मेंदूला आणि डोक्याला इजा झाल्यामुळे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांना अति दक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी मित्र अरुण शौरी यांची आवर्जून रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्यात छान संवाद झाला. आता अरुण शौरी यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ गांधी म्हणाले.
 

Web Title: Prime Minister Narendra Modi meets BJP leader Arun Shourie at hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.