पुण्यातील विद्यार्थ्याचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक; कॉमन मॅन झेंडा फडकवताना काढले होते चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:15 IST2022-03-04T17:15:14+5:302022-03-04T17:15:21+5:30
कॉमन मॅन झेंडा फडकविताना काढलेल्या चित्राचे कौतुक करण्यासोबतच यशराज चे अभिनंदन करणारे पत्र यशराज ला पंतप्रधान कार्यालयाकडून स्पीड पोस्टद्वारे आले आहे

पुण्यातील विद्यार्थ्याचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक; कॉमन मॅन झेंडा फडकवताना काढले होते चित्र
पुणे : पुण्यातील यशराज अजय दुधाणे या इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. कॉमन मॅन झेंडा फडकविताना काढलेल्या चित्राचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कौतुक केले. माॅडेल काॅलनी येथील विद्याभवन स्कूलमध्ये यशराज शिकतो.
यशराज लहानपणापासूनच अभ्यासाबरोबर शाळेत विविध स्पर्धा मध्ये सहभाग घेतो. याशिवाय चित्र काढणे, ओरिगामी, किल्ले बनविणे, घरगुती विनावापरातील इलेक्ट्राॅनिक वस्तूचा वापर करुन खेळणी बनविणे यांसह क्रिकेट आणि ट्रेकींग मध्ये देखील त्याला रस आहे. चित्रकलेची एलिमेंटरी परीक्षा देऊन तो उत्तीर्ण झाला आहे.
कॉमन मॅन झेंडा फडकविताना काढलेले चित्र त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते. त्या चित्राचे कौतुक करण्यासोबतच यशराज चे अभिनंदन करणारे पत्र यशराज ला पंतप्रधान कार्यालयाकडून स्पीड पोस्टद्वारे आले आहे.