Narendra Modi | इंद्रायणीतीरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार वारकऱ्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:16 PM2022-06-10T17:16:57+5:302022-06-10T17:24:15+5:30

पंतप्रधान वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांशीही साधणार संवाद...

prime Minister Narendra Modi visit to dehu dialogue with Warkaris in dehugaon | Narendra Modi | इंद्रायणीतीरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार वारकऱ्यांशी संवाद

Narendra Modi | इंद्रायणीतीरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार वारकऱ्यांशी संवाद

googlenewsNext

श्री क्षेत्रदेहूगाव : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील देहूनगरीत शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १४ जूनला होणार आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिर आवार, शिळा मंदिर, सभास्थानी तयारी सुरू आहे. दुपारी एक ते दोन या कालखंडात पंतप्रधान देहूनगरीत येणार असून मंदिरातील सोहळा आणि वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांशी संवाद साधणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा आनंद सोहळा अर्थात आषाढी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे देहूनगरीत चैतन्याचे वातावरण आहे. श्री. श्रेत्र देहूगाव येथील संत तुकाराम महाराज देवस्थानाच्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराशेजारी शिळा मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. या सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी होणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. देवस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्यापही मिनिट टू मिनिट कार्यक्रम जाहिर केला नसला तरी नियोजनानुसार दुपारी एक ते दोन या वेळेत पंतप्रधान देहूनगरीत असणार आहेत.  

असा होईल सोहळा
१) देहूगाव येथे उभारलेल्या हॅलीपॅडवर पंतप्रधानांचे आगमन होईल. त्यानंतर इंद्रायणीतीरावरील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात  वारकºयांच्या वेशात पंतप्रधान येतील. विठूरायाचे दर्शन घेऊन शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. त्याचवेळी देवस्थानाच्या वतीने तुकोबांची पगडी आणि उपरणे देऊन पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येईल. यावेळी मंदिरात निवडक वारकरी, सेवेकरीही उपस्थित असतील.  
२) पंतप्रधानाच्या उपस्थितीतील सोहळ्यासाठी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरील माळवाडी  हद्दीत २२ एकर जागेत बंदिस्त सभागृह तयार केले आहे. त्याठिकाणी चाळीस हजार वारकरी बसतील एवढी क्षमता असणार आहे. तिथे पंतप्रधानाचे आगमन झाल्यानंतर देवस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात येईल. त्यानंतर अध्यक्षांचे मनोगत आणि त्यानंतर पंतप्रधानाचे भाषण होईल. तसेच सोहळ्यास उपस्थित असणाºया वारकऱ्यांशीही ते वारीच्या अनुषंगाने संवाद साधणार आहेत.

अशी सुरू आहे तयारी-
देहूनगरीत मंदिरातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान आल्यानंतर मंदिर आवारात कोण उपस्थित राहणार, सोहळ्याच्या ठिकाणी आसन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था कशी असेल, याचा आढावा घेण्यात आला. तसेच शिळा मंदिर ठिकाणी होणाºया कार्यक्रमाचीही तयारीही देवस्थानाने केली आहे. तसेच सभागृहातील आसन व्यवस्था याविषयी भाजपाचे नेत्यांनी पाहणी केली आहे. हॅलीपॅड उभारण्याचे काम सुरू आहे. आजही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सभा स्थळाची पाहणी केली. तसेच  देहूगावात जाणारी वाहतुक सोमवारी सायंकाळी आणि मंगळवारी वळविण्यात येणार आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले

Web Title: prime Minister Narendra Modi visit to dehu dialogue with Warkaris in dehugaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.